Google Ad
Uncategorized

राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ ऑगस्ट) : राज्य सरकार सर्वसामान्यांचा विचार करून कायमच नवनवीन घोषणांवर भर देत आहे. अशातच राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य सरकार 2011 आधीच्या गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीत राज्य सरकारने या विषयावर चर्चा केली. त्यामुळे आता यासंदर्भात लवकरच शासन निर्णय प्रकाशित केला जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित केल्यास लाखो गोरगरिबांना, झोपडपट्टीधारकांना त्याचा लाभ होणार आहे. येत्या काही दिवसात यासंदर्भात सरकारकडून आदेश काढला जाणार आहे.

Google Ad

राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री, विभागांचे सचिव उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!