Google Ad
Uncategorized

मोदी सरकारची दिवाळी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ ऑक्टोबर) : दिवाळीनिमित्त केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने मंगळवारी (17 सप्टेंबर) दिवाळी बोनस जाहीर केला. या अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप बी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे.

आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने हे निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी, 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी महागाई भत्त्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.

Google Ad

पुढील महिन्यात दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (अॅड-हॉक बोनस) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी (नॉन-राजपत्रित कर्मचारी), जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांनाही हा बोनस दिला जाईल. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

आणखी कोणते निर्णय होण्याची शक्यता?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यावेळची दिवाळी आनंदाची असणार आहे. दिवाळी सणानिमित्त त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए वाढ) वाढवून दिवाळीची भेट देऊ शकते. याआधी दसऱ्यापर्यंत याची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, आता दिवाळीच्या निमित्ताने महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यातही वाढ करू शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 46 टक्के होण्याची शक्यता आहे. बुधवारी (18 ऑक्टोबर) सकाळी 10.30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

पगार आणि डीएचा हिशोब

जर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 3 टक्क्यांनी वाढवला तर 18,000 रुपये मूळ वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 7,560 रुपयांवरून 8,100 रुपये होईल. म्हणजेच त्यांच्या पगारात थेट 540 रुपयांची वाढ होणार आहे. 4 टक्के वाढीच्या आधारे बघितले तर महागाई भत्ता 8,280 रुपये आणि पगार 690 रुपयांनी वाढेल. जर आपण कमाल मूळ वेतनाच्या आधारावर त्याची गणना केली, तर 45 टक्के दराने 56,900 रुपयांचा डीए 23,898 रुपयांऐवजी 25,605 रुपये होईल. तर 46 टक्क्यांनुसार ते 27,554 रुपये झाले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!