Categories: Uncategorized

चिंचवड विधानसभेतील ४२ लाभार्थ्यांना संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन पात्रांचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ एप्रिल) : भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन व चिंचवड विधानसभेचे प्रचार प्रमुख शंकर शेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या 42 लाभार्थ्यांना पेन्शन पत्र वाटप करण्यात आले.

चिंचवड विधानसभेतील संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना मधील विधवा अंध अपंग मूकबधिर कर्णबधिर घटस्फोटीत व 65 वर्षावरील नागरिकांना वरील कार्यक्रमाचे औचित्य साधून लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्तारूढ पक्षनेते माननीय श्री नामदेवजी ढाके यांच्या शुभहस्ते पेन्शन पत्र वाटप करण्यात आली याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन नगरसेविका सविताताई खुळे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, प्रभागाचे अध्यक्ष माधव मनोरे, सांगवी काळेवाडी मंडलाचे सरचिटणीस दीपक जाधव उपस्थित होते.

याप्रसंगी नामदेव ढाके यांनी भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त पक्षाविषयी माहिती दिली स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभेमध्ये 5000 लाभार्थ्यांना पेन्शन चालू केलेली शिंदे फडणीस सरकार यांनी मागच्या महिन्यामध्ये संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 500 रुपयाची मानधनात वाढ केलेली असून याबद्दल सरकारचे त्यांनी आभार मानले लक्ष्मणभाऊंनी जी आम्हाला समाजकार्याची शिकवण दिलेली आहे यापुढेही असेच कार्य चालू राहील असे सांगितले लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन चालू होणार असल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर द्विगुणित आनंद दिसत होता तसेच पेन्शन पत्र मिळाल्यानंतर सर्व खातेदारांनी बँकेमध्ये जाऊन खाते ओपन करून पासबुक मिळाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये जमा केल्यानंतर पेन्शन चालू होईल व दरवर्षी जानेवारी ते मार्च बँकेमध्ये जाऊन हयातिचा दाखल्याचा फॉर्म भरून देणे याविषयी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांनी माहिती दिली व कार्यक्रमाचे आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago