चिंचवड विधानसभेतील संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना मधील विधवा अंध अपंग मूकबधिर कर्णबधिर घटस्फोटीत व 65 वर्षावरील नागरिकांना वरील कार्यक्रमाचे औचित्य साधून लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्तारूढ पक्षनेते माननीय श्री नामदेवजी ढाके यांच्या शुभहस्ते पेन्शन पत्र वाटप करण्यात आली याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन नगरसेविका सविताताई खुळे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, प्रभागाचे अध्यक्ष माधव मनोरे, सांगवी काळेवाडी मंडलाचे सरचिटणीस दीपक जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी नामदेव ढाके यांनी भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त पक्षाविषयी माहिती दिली स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभेमध्ये 5000 लाभार्थ्यांना पेन्शन चालू केलेली शिंदे फडणीस सरकार यांनी मागच्या महिन्यामध्ये संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 500 रुपयाची मानधनात वाढ केलेली असून याबद्दल सरकारचे त्यांनी आभार मानले लक्ष्मणभाऊंनी जी आम्हाला समाजकार्याची शिकवण दिलेली आहे यापुढेही असेच कार्य चालू राहील असे सांगितले लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन चालू होणार असल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर द्विगुणित आनंद दिसत होता तसेच पेन्शन पत्र मिळाल्यानंतर सर्व खातेदारांनी बँकेमध्ये जाऊन खाते ओपन करून पासबुक मिळाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये जमा केल्यानंतर पेन्शन चालू होईल व दरवर्षी जानेवारी ते मार्च बँकेमध्ये जाऊन हयातिचा दाखल्याचा फॉर्म भरून देणे याविषयी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांनी माहिती दिली व कार्यक्रमाचे आभार मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…