महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँकेची पंचवार्षिक निवडणुक २०२३ – २०२८ ही ०४ जून रोजी मतदान होऊन, आणि ०५ जून रोजी मत मोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत बँकेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष यांच्या धर्मवीर संभाजी सहकार पॅनलचे १५ पैकी १३ उमेदवार विजयी झाले, तर विरोधात असणाऱ्या धर्मवीर संभाजी बँक बचाव पॅनल चे ०२ उमेदवार विजयी झाले. भागधारक, खातेधारक, सभासदांनी पुन्हा एकदा बँकेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून बँक त्यांच्या ताब्यात दिली.
धर्मवीर संभाजी अर्बन सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली यात, विजयी उमेदवारांनी चिंचवड मतदार संघाचे भा ज पा.निवडणुक प्रमुख, प्रभारी आणि मा.नगरसेवक शंकर जगताप यांनी सदर पॅनेलसाठी बहुमोल योगदान दिले त्याबद्दल भेट घेतली. यावेळी शंकर जगताप यांचा विजयी उमेदवारांनी धन्यवाद मानत सत्कार केला.
यावेळी शंकर जगताप यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाबुराव शितोळे व ॲडवोकेट गोरक्षनाथ झोळ व बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक गोकुळजी शितोळे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धावडे,नवनिर्वाचित संचालक अॅड.सुभाषजी माछरे या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंकर जगताप यांनी सर्व पॅनल उमेदवारांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
यावेळी विद्यमान अध्यक्ष अॅड.गोरखनाथ झोळ, बाबूराव शितोळे, बांधकाम व्यावसायिक श्री गौतमजी मागाडे,प्रमुख व्यक्तीमत्व श्री शंकरशेठ जगताप पक्ष नेते नामदेव डाके सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे,पिं चिं शहर जिल्हा भा ज पा उपाध्यक्ष श्री प्रकाशतात्या जवळकर, गणेश शेठ वाळूंजकर प्रहार चे संजय गायके ओबीसी सरचिटणीस कैलास सानप जिल्हा चिटणीस देवदत्त लांडे गणेश ढाकणे सामाजिक कार्यकर्ते श्री अंकुशजी कापसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…