Categories: Uncategorized

सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावरील ‘पंडित प्रदीपजी मिश्रा’ यांच्या शिव पुराण कथेने भाविक मंत्रमुग्ध

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ सप्टेंबर) : दिवाळीच्या निमित्ताने आपण घराची साफसफाई करतो, त्याप्रमाणे इतर सन, उत्सवाच्या वेळी करत नाही. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते, जे घर सर्वात स्वच्छ असते. त्याच घरात लक्ष्मी जास्त काळ निवास करते. याप्रमाणे केवळ दिवाळीच नाही,  तर इतर वेळीदेखील लक्ष्मी घरात येत असेल तर, घराप्रमाणे मनाचीही साफसफाई करावी. मनातील अहंकार दूर करा. लक्ष्मी कायमस्वरुपी आपल्याकडे वास्तव्य करेल, असा संदेश आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवपुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी दिला.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप हे या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आहेत.

गेल्या दोन दिवसांत भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, राजस्थान येथील आमदार केसाराम चौधरी, माजी खासदार नानासाहेब नवले, अशोक मोहोळ, बाप्पुसाहेब भेगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, प्रांत संपर्कप्रमुख मिलिंदराव देशपांडे, प्रांत मंडलसदस्य प्रकाश मिठभाकरे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, माजी नगरसेविका झामाबाई बारणे, अश्विनी चिंचवडे, कामगार उपायुक्त अभय गीते, उद्योजक नितीन काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, शहर अभियंता मकरंद निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, पोलीस उपाधीक्षक राहुल आवारे, भाजपाच्या युवा मोर्चा सरचिटणीस तेजस्विनी कदम, कांतीलाल गुजर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.

पं. प्रदीपजी मिश्रा यांनी अतिथी कसा असावा यावर मार्गदर्शन करताना म्हाणाले की,  ‘अतिथी देवो भव’ अशी आपली संस्कृती आता लोप पावत चालली आहे. आता येणारे अतिथी हे दोन प्रकारचे असतात. एक जो मन पाहून येतो, दुसरा जो तुमची आर्थिक स्थिती पाहून येतो. तुमची आर्थिक स्थिती पाहून येणाऱ्यांना तुम्ही अतिथी म्हणू शकत नाही. ते केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी जवळीक साधत आहेत.

आरोग्य व शिक्षण मोफत हवे…
शिव पुराण कथेतील सिद्धीविनायक गणेशाचा महिमा विशद करताना पं. प्रदीप मिश्रा यांनी राज्यकर्त्यांकडून अपेक्षाही केल्या. शिव पुराणामध्ये उल्लेख आहे. भगवान शंकराने मानवजातील दोन महत्त्वाच्या बाबी दिल्या. बुद्धीची देवता श्री गणेश आणि दवाई अर्थात महामृत्यूंजय मंत्र. त्यामुळे राज्यकर्त्यांना पुण्यातून केंद्रापर्यंत संदेश गेला पाहिजे की, अन्न किंवा वस्त तुम्ही मोफत देवू नका. आरोग्य सेवा व शिक्षण हे कोणत्याही राष्ट्रात मोफत असायला हवे. अनेक गरीब नागरिकांचा मृत्यू चांगल्या आरोग्य सुविधांसाठी मोठा खर्च करू न शकल्याने होतो.  अनेक चांगल्या विद्यार्थ्यांना देखील क्षमता असून देखील पैशांअभावी दर्जेदार शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे कोणत्याही राष्ट्रामध्ये आरोग्यसेवा व शिक्षण या दोन गोष्टीतरी किमान मोफत असाव्यात. यासाठी प्रत्येक राज्यकर्त्याने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

2 days ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 week ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

3 weeks ago