पोशि १३०२ केकाण , पोशि २२ ९ ६ जैनक व पोशि २३ ९९ बाळसराफ असे रेकॉर्डवरील गुन्हेगार , फरारी आरोपी , तडीपार आरोपी यांची माहीती घेत पेट्रोलींग करीत फिरत असताना चाकण पोलीस ठाण्याचे हददीत तळेगावचौक , चाकण , ता . खेड जि . पुणे येथे आले असता पोना सानप यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , “ महेश पडवळ नावाचा इसम त्याचेकडे एक गावठी पिस्तुल असुन तो चाकण मार्केट येथे जाणार आहे , त्याने अंगात पांढरे रंगाचा शर्ट व काळे रंगाची पॅन्ट परीधान केलेली असुन तोंडावर फिकट निळया रंगाचा युज अॅन्ड थ्रो मास्क लावलेला आहे ” अशी खात्रीशिर बातमी मिळाली असता सदरची बातमी ही वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांना कळविली असता , त्यांनी दिलेल्या सुचना मार्गदर्शनाखाली आंबेठाण चौक , चाकण , पुणे येथे सापळा लावला असता काही वेळातच आंबेठाण गावचे दिशेकडुन मिळालेल्या बातमीतील वर्णनाप्रमाणेचा इसम पायी येत असताना दिसला .
तो इसम हा बातमीतीलच इसम असलेची खात्री झाल्याने सर्व पथकाने त्यास १६.१५ वा . पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव महेश बाळु पडवळ , वय- २० वर्षे , रा . मु.बोरदरा , पो . आंबेठाण , ता.खेड जि.पुणे असे असल्याचे सांगितले . त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे कि.रु. ५१,००० ची असा माल मिळुन आलेने त्याचे विरोधात चाकण पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३.५ ( २५ ) तसेच सह कलम महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कारवाई पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश सो , अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे सो , पोलीस उप आयुक्त श्री . सुधिर हिरेमठ सो , सहा.पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री आर.आर.पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक शंकर बाबर , पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले तसेच स.पो.फौ.हजरत पठाण , पो.हवा.यदु आढारी , पो.ना. विठठल सानप , गंगाधर चव्हाण , महेश भालचिम पो.शि. योगेश्वर कोळेकर , नाथा केकाण , सागर जैनक व त्रिनयन बाळसराफ यांचे पथकाने केली आहे .
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…