Categories: Editor Choiceindia

Karnataka : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला सोमवारी भीषण अपघात … यामध्ये त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला सोमवारी भीषण अपघात झाला . श्रीपाद नाईक आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी आणि संरक्षण राज्यमंत्री आहेत. यामध्ये नाईक यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा या अपघातात मृत्यू झाला.

श्रीपाद नाईक यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर श्रीपाद नाईक यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पण, त्यांच्या पत्नीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांच्या गाडीत सहा जण असल्याची माहिती आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे ही घटना घडलीय. उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी पलटी झाली. नाईक हे त्यांच्या पत्नीबरोबर जात असताना ही दुर्घटना झाली. अपघातानंतर नाईक यांच्या पत्नी बेशुद्ध होत्या आणि त्या बराच वेळपर्यंत शुद्धीवर आल्या नाहीत. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

श्रीपाद नाईक यांना सध्या गोवा येथील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा येथे श्रीपाद नाईक यांच्यावर योग्य उपचारासाठी होत आहेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचनी दिल्या आहेत.

कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून जात असताना श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितलं जात आहे. श्रीपाद नाईक यांच्यासह इतर तीन जण किरकोळ जखमी झालेत. हा अपघात किती भीषण होता या अंदाज श्रीपाद नाईक यांच्या गाडीवरुन येतो. अपघातानंतर नाईक यांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातानंतर त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये अडकल्याचं दिसून येतं. त्यांच्या गाडीचं वरचं छत पूर्णपणे दबलं गेलं आहे. तसेच, बोनटचा देखील चक्काचूर झाला आहे. त्यांच्या गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्यंचं दिसून येत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

3 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago