महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” या उपक्रमाने निगडीतील भक्ती शक्ती चौकात स्वच्छतेचा महाउत्सव आज नागरिकांनी अनुभवला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात “स्वच्छतेची शपथ” घेत दोन हजारांहून अधिक नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. भक्ती शक्ती चौकातून ट्रान्सपोर्ट नगरी चौक, देहूरोड चौक, अंकुश चौक, पिंपरी चौक, आकुर्डी चौक याठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर स्वच्छता मोहिम राबवत जवळपास १२ टन कचरा गोळा करण्यात आला. आमदार उमा खापरे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, महेश आढाव, शांताराम माने, तानाजी दाते, कुंडलिक दरवडे, अंकुश झिटे,राजेश भाट, सुधीर वाघमारे, माजी नगरसदस्य सचिन चिखले, नारायण बहिरवाडे, त्रिपुरा राज्यातील आगरतळा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अमित कर्माकर, सहाय्यक लेखाधिकारी बलई चंद्रदास, उप प्रकल्प समन्वय अधिकारी सुरोजित दास, वित्त व्यवस्थापन अधिकारी पवन पारीक, सामाजिक संरक्षक अधिकारी रेखा दुबे यांच्यासह रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघ, महेंद्र लॉजिस्टिक्स अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अमृता विद्यालय, मॉडर्न कॉलेज, सायरस पुनावाला स्कूल, शिशुविहार विद्यालय, प्रा.रामकृष्ण मोरे विद्यालय, पीसीईटी कॉलेज अशा विविध शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह यावेळी म्हणाले की, स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराने राज्यात प्रथम तर देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने योगदान हे आपल्या सफाई मित्रांचे आहे. शहरामध्ये दैनंदिन स्वच्छता राहावी, यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. आता स्वच्छता सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये आपल्याला देशात अग्रेसर यायचे आहे. त्या अनुषंगाने महापालिका विविध उपक्रम राबवत असून नागरिक देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. आज “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” या उपक्रमाला शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आपले पिंपरी चिंचवड देशात स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर येण्यासाठी नागरिकांचे असेच सहकार्य भविष्यातही कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ‘फिट माय सिटी’ ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या झुंबामध्ये नागरिक देखील सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी करून स्वच्छतेच्या मोहिमेची माहिती दिली. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक व आर.जे. बंड्या यांनी केले.
……
*स्वच्छतेची घेतली शपथ*
“आम्ही अशी शपथ घेतो की, आम्ही स्वतः स्वच्छतेच्या प्रति जागरूक राहू आणि त्यासाठी वेळही देऊ. दरवर्षी १०० तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करू. आम्ही स्वतः घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही. सर्वप्रथम आम्ही स्वतःपासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या गल्ली/वस्तीपासून आमच्या गावापासून तसेच आमच्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करू. आम्हाला हे मान्य आहे की, जगामधील जे देश स्वच्छ आहेत, त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व घाण करूनही देत नाहीत. या विचारांनी आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करू. आम्ही आज शपथ घेत आहोत, ती आणखी १०० लोकांकडूनही करवून घेऊ. ते पण आमच्यासारखे स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्हाला माहिती आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करील”… अशी शपथ यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या उपस्थितांनी घेतली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.
….
*२०२५ करीता नवीन ब्रँड ॲम्बेसिडरची नियुक्तीची करण्यात आली घोषणा…*
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यावेळी शहरातील स्वच्छतेच्या ब्रँड ॲम्बेसिडरची घोषणा करण्यात आली. या ब्रँड ॲम्बेसिडरमध्ये…
अ प्रभाग – पवन शर्मा
ब प्रभाग – मोहन गायकवाड
क प्रभाग – अरविंद भोसले, तानाजी भोसले
ड प्रभाग – डॉ. नंदकुमार धुमाळ, बाळासाहेब साळुंखे
ई प्रभाग – विलास नाईकनवरे, सुजाता परदेशी
फ प्रभाग – सुनील कदम
ग- मनीषा राठोड,
ह प्रभाग- अदिती निकम
शहरस्तर – आर.जे. बंड्या
यांचा समावेश आहे.
तर आर.जे. बंड्या संपूर्ण शहरात स्वच्छता विषयक मोहिमेत सहभागी असणार आहेत.
या सर्वांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
*स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद*
“श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” या मोहिमेंतर्गत भक्ती शक्ती चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाक्षरी फलकांवर आयुक्त शेखर सिंह यांनीही स्वाक्षरी करताना ‘स्वच्छता ही सेवा’ असा संदेश लिहिला.
……
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर : डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच लंडन ब्रिज, युरोपियन…