Categories: Editor Choice

जीवघेण्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा नवी सांगवीतील नागरिकांची मागणी … कुत्र्याच्या चाव्याने अनेक नागरिक त्रस्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 31 मे 2026 :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून जात असताना या जेष्ठ महिलेच्या पाठीमागे कुत्रे लागल्यामुळे घाबरून गाडीवरून पडून गंभीर रित्या जखमी पडल्याची घटना घडून आता अनेक महिने लोटले तरी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका पशुवैद्यकीय विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करत नसल्याचे दिसून येत आहे.

आता ही ढोरे पाटील फार्म, न्यू भारत बेकरी रोड च्या शेवटी स्वामी विवेकानंद नगर चौक येथे आणि सुरवातीला टॉवर लाईन, सी.एम.ई. कॉलनी येथे भरपूर भटकी कुत्री झाली आहेत. चालणाऱ्या, गाडीवरील येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जातं आहेत, चावा घेत आहेत. सदर दोन्ही ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, ही विनंती आणि मागणी नागरिकांनी सारथी पोर्टलवर पण त्या संदर्भात  दि. २० मे, २०२६ रोजी तक्रार दिली होती.

ढोरे पाटील फार्म, न्यू भारत बेकरी रोड च्या शेवटी स्वामी विवेकानंद नगर चौक येथे आणि सुरवातीला टॉवर लाईन, सी.एम.ई. कॉलनी येथे भरपूर भटकी कुत्री झाली आहेत. चालणाऱ्या, गाडीवरील येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जातं आहेत, चावा घेत आहेत. सदर दोन्ही ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, ही विनंती करणारी तक्रार एका नागरिकाने सारथी पोर्टलवर दि. २० मे, २०२६ रोजी तक्रार दिली होती.

( असा मेसेज ही आला Thank You for connecting with PCMC SARATHI HELPLINE Your Grievance Token Number is H329559 – PCMC )

परंतु अद्याप सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, आता तरी महानगरपालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहे का? पिंपरी चिंचवड महानगरपालिका पशुवैद्यकीय विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या तसेच अनेक जेष्ठ नागरिकांकडून वारंवार होत आहे.

दिल्लीतील एका लहान मुलीला भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीज झाल्याचे वृत्त वाचून सर्वोच्च न्यायालयाने 28 जुलै 2025 ला स्वतःहून या प्रकरणी खटला दाखल करून घेतला. यापूर्वीच्या आदेशात भटक्या कुत्र्यांना हटवून निवारा केंद्रांमध्ये बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाबाबत प्राणिप्रेमींच्या नाराजीची दखल घेत, न्यायालयाने या प्रकरणी नव्या खंडपीठाची स्थापना करत, आधीच्या आदेशांमध्ये सुधारणा केली. निर्बीजीकरण, लसीकरण व जंतुनाशक औषधे दिल्यानंतर निवारा केंद्रातील भटक्या कुत्र्यांना सोडून द्यावे, असे आदेश दिले.

या सुविधा पिंपरी चिंचवड मनपामध्ये निर्माण केव्हा होणार, हे ठाऊक नाही. त्याबाबत यंत्रणांना कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. तोपर्यंत भटक्या कुत्र्यांचे संकट कायम राहू शकते, एवढे मात्र नक्की…

तसेच रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांना खायला देण्यास कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, असे निर्देशही दिले गेले; पण या निर्देशांचे पालन होत आहे की नाही, हे कोण पाहणार? पाळीव कुत्र्यांच्या प्रश्नही गंभीर आहे. सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे पसरवल्या जाणार्‍या अस्वच्छतेला जबाबदार कोण? त्याबाबत कोणतेही नियम नाहीत व असल्यास, त्यांचे पालन होताना दिसत नाही, हे वास्तव आहे. प्राणिदया दाखवताना माणसांचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे. शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाचे व्यवस्थापन आणि नियोजन करताना त्यावर ठोस उपाययोजना करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यासंबंधीचे नियम आणि कायदे सुस्त यंत्रणादी कागदावर ठेवल्याने या प्रश्नाची तीव्रता वाढली आहे.

या भूतलावर माणसांप्रमाणे पशुपक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. पशुपक्षी माणसावर प्रेम करतात, त्याचप्रमाणे असंख्य माणसेही जनावरांना माणसासारखे वागवत असल्याचे पाहायला मिळते. पण, त्याचवेळी मानवी आरोग्य आणि सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी लागते.

भटकी कुत्री ही पिंपरी चिंचवडच्या शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेली आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यांत असंख्य लोक जखमी, तर काहीवेळा लहान मुले मृत्युमुखी पडली. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव असलेल्या भागांतून लोकांना जीव मुठीत धरून जावे लागते. नवी सांगवीतील कृष्णा नगर, भारत बेकरी, औंध जिल्हा रुग्णालय परिसर तसेच आजूबाजूच्या परिसरात याचा अनुभव वारंवार येतो.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 week ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago