Categories: Uncategorized

या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार … तर, नवीन मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ चेहर्‍यांना मिळू शकते संधी?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. न्यायालयाच्या निकालाने शिंदे- फडणवीस सरकारला अभय मिळाल्यानंतर आत्ता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा गेली नऊ महिने रखडलेला विस्तार आता लवकरच होणार असून, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

मे महिनाअखेरीसच हा विस्तार करून शिंदे-फडणवीस सरकार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत.

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे बोलले जात असताना, भाजपने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना यश आले तर मंत्रिमंडळात काही जागा येणार्‍यांसाठी असाव्यात म्हणूनही त्या रिक्त ठेवल्याची चर्चा भाजपमध्ये होती. मात्र, आता भाजप-शिवसेना आपल्या जागा भरणार आहे. मेअखेरीस हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक संभाव्या तारखा जाहीर झाल्यानंतरही विस्तार होऊ शकला नाही. तसंच, शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलल्याने महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला जोर आला आहे.

▶️नवीन मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ चेहर्‍यांना मिळू शकते संधी?

शिंदे गटातून बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय शिरसाट, योगेश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावर यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपमधून राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, योगेश सागर, माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल, पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ, मुरबाडचे आमदार किसन कथोरे अशा चेहर्‍यांना संधी मिळू शकते.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago