Categories: Editor Choice

गुजरात निवडणुकीत भाजपचा विक्रम, इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाकडे वाटचाल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०८ डिसेंबर) : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या निवडणुकीतही पक्ष मताच्या टक्केवारीत नवा विक्रम करू शकतो. निवडणुकीत भाजपला 52 टक्के मते मिळत आहेत, तर काँग्रेसला 34 टक्के आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (आप) 19 टक्के मते मिळत आहेत.

भारतीय जनता पक्ष (भाजप) गुजरातमधील विधानसभेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे आणि पक्ष 152 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस २० जागांवर तर आम आदमी पार्टी ६ जागांवर आघाडीवर आहे. 4 अपक्षही आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर आहे आणि पक्षाने 1985 साली 149 जागा जिंकल्या होत्या.

गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून रिवाबा जडेजा ५०० मतांनी पिछाडीवर आहेत. रिवाबा ही भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आहे. तर गांधीनगर दक्षिण मतदारसंघात भाजपचे अल्पेश ठाकोर ४१३० मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय मोरबी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया १०१५६ मतांनी पुढे आहेत. ऑक्टोबरमध्ये मोरबी पूल कोसळण्याच्या वेळी त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात 182 जागांवर मतदान झाले. यावेळी 66.31 टक्के मतदान झाले. तर 2017 मध्ये 71.28 मते पडली होती. पहिल्या टप्प्यात 60.20 टक्के मतदान झाले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 mins ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

13 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

14 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago