Categories: Editor Choice

सांगवी, नवी सांगवी -पिंपळे गुरव मध्ये भक्तीमय वातावरणात दत्त जयंती मोठया उत्सहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ डिसेंबर) : आज (०७ डिसेंबर) मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रेय जयंती सांगवी, नवी सांगवी -पिंपळे गुरव मध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण होते. तसेच अनेक ठिकाणी सर्वत्र दुपारनंतर महाप्रसादाचे आयोजन करत या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

आज बुधवारी ( दि. 7 ) रोजी श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा करण्यात आला. पहाटेपासून विविध ठीकाणी मंदिरात खास करून श्री साई व श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक विधी सुरू झाले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नाद प्रत्येक मंदिरात पहाटेपासून ऐकू येत होता. सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले. तर दुपारी आरती व तीर्थ प्रसादाचा कार्यक्रम झाला.

आज कासारवाडी येथे आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार’ आणि श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम द्वारा आयोजित हरिनाम कीर्तन सप्ताह दि.०१ डिसेंबर ते ०८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. हरिकीर्तन सप्ताहाच्या सातव्या दिवशी हभप रामायणाचार्य ‘समाधान महाराज शर्मा’ यांचे स्वामी विवेकानंद यांच्या रुपाने कीर्तनातून त्यांनी भाविकांना प्रबोधित केले. भाविकही त्याचा आनंदाने आस्वाद घेत होते. त्या नंतर दत्त जन्म सोहळा पार पडला.  दत्त मंदिरात दत्त जन्माच्या सोहळ्याचे किर्तनाने तसेच दत्त गुरूंच्या भजनाने मान्यवरांच्या उपस्थित हा भावभक्तीचा सोहळा पार पडला. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सर्व भक्तांना मोठया प्रमाणावर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

 

सांगवी येथील बालयोगी नंदकुमार दत्त आश्रमाच्या वतीने आज कु-हेकर महाराज यांच्या किर्तनाने त्यानंतर दत्त जन्माच्या सोहळ्याने आज दत्त जयंती कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसत होते.दत्तजयंती निमित्ताने दर वर्षीप्रमाणे याही वर्षीही सात दिवस संध्याकाळी ७ ते ९ ह्या कालावधीमध्ये श्री दत्त आश्रम सांगवी येथे शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे मंदिर प्रमुख तुकाराम भाऊ महाराज यांनी सांगितले.

श्री सूर्यमुखी दत्त मंदिर कृष्णा चौक नवी सांगवी येथे दत्त जयंती उत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला, त्यावेळी कार्यक्रमाला माननीय शंकर जगताप व पोलीस उपनिरीक्षक तांबे तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

सेवा व बालसंस्कार सेवा केंद्र कवडे नगर क्रांती चौक ,नवी सांगवी येथे श्री दत्तजयंती निमीत्त अखंड नाम जप,यद्य-याग सप्ताहाचे आयोजन दि. १ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यान करण्यात आले. या दरम्यान ३५० अधिक भाविक सेवेकर्यांनी सामुहिक श्री गुरुचरीत्र वाचन सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजु केली. आज दत्त जयंती निमित्त स्वामींच्या भाविक भक्तांनी आज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यात महिलांचा सहभाग मोठा होता.

नवी सांगवी दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.

 

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

11 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago