Categories: Editor Choice

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ डिसेंबर) : मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, अध्यात्मिक व कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व, माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे यांचे गुरुवारी (दि.८) दुपारी दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते ७५ वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी भागुबाई, दोन भाऊ, मुलगा मनोहर आणि प्रशांत, तीन मुली, पुतण्या तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

इंदोरी गावचे उपसरपंच म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य, मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, दोन वेळा मावळ तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

9 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

16 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago