Google Ad
Uncategorized

भाषाप्रभू, गुरुवर्य ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांचे ” श्रीराम मंदिर अयोध्या” येथे “श्रीरामलल्ला” समोर श्रीराम मंदिरात होणार कीर्तन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ फेब्रुवारी) : शिवजन्मभूमीचे सुपुत्र जगद्गुरुकृपांकित भाषाप्रभू, गुरुवर्य ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांचे ” श्रीराम मंदिर अयोध्या” येथे “श्रीरामलला समोर” श्रीराम मंदिरात होणार कीर्तन आणि हे कीर्तनाचे मानकरी होण्याचा सन्मान प्राप्त करणारे आपले पंकज महाराज ठरणार देशातील पहिले कीर्तनकार

“श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास” चे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास जी यांचे निमंत्रणपत्र व न्यासाकडून फ्लाईट चे तिकीट  प्राप्त झाले आहे.

Google Ad

प्रभू श्रीराम प्राण – प्रतिष्ठा समारोह अंतर्गत महा ” मण्डल – पूजा अनुष्ठान” ज्यात देशातील आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तिमत्त्वांना निमंत्रित केले गेले आहे त्यात न्यासाकडून “मण्डल-पूजा अनुष्ठान” निमित्ताने देशभरातून एकमेव होणारे २ तासांचे कीर्तन करण्यासाठी पंकज महाराज यांना दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी अयोध्या येथे निमंत्रित करण्यात आले आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी अभिमानाचा क्षण आहे.

कीर्तन १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे. पंकज महाराज यांची रामायणात सांगितलेल्या ज्ञान, त्याग, भक्ती व वैराग्य या ४ सूत्रांवर, ज्ञानोबा तुकोबांच्या शिकवणीवर जी निस्पृह आध्यात्मिक वाटचाल सुरू आहे तिचे हे त्यांना जगद्गुरुंच्या कृपेने मिळालेले फळ आहे आणि कार्तिकी एकादशीचा झालेला जन्म, आई वडिलांचे आशिर्वाद, महाराजांचे निस्वार्थी भावनेने केलेल्या आध्यात्मिक सेवेद्वारे निर्माण झालेले पुण्यकर्म आणि आपल्या सर्व स्नेही, मित्र व नातेवाईकांच्या शुभेच्छा या कायम त्यांच्या पाठीमागे ठाम आहेत त्या सर्वांची ही फलश्रुती आहे.

पंकज महाराज यांचे नाव त्या त्या वेळी आदराने म्हंटले जाईल ज्या ज्या वेळी विश्वकीर्तीचे प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या येथे श्रीरामलला समोर पहिले कीर्तन कुणाचे झाले तर आपल्या पंकज महाराज यांचे झाले हा आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे.

श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहत आहेत, या उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल. लवकरात लवकर हे मंदिर उभे राहावे याकरिता डॉ.पंकज महाराज गावडे यांनी आपले जीवन समर्पन केले आहे, या पुण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हे निमंत्रण मिळाले असल्याची भावना भाविक भक्त व्यक्त करत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!