महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ डिसेंबर) : आज (दि .६ डिसेंबर रोजी) पिंपळे गुरव येथे समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळ व पिंपळे गुरव ग्रामस्थ यांच्या विद्यमाने श्री भैरवनाथ जन्मोत्सव आणि काकडा आरती सांगता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम संकिर्तन यज्ञ सोहळा श्री भैरवनाथ मंदीर, श्री क्षेत्र पिंपळे गुरव येथे आयोजित करण्यात आला होता.
आज दि. ०६ डिसेंबर रोजी ह.भ.प.श्री. उत्तम महाराज बढे (आळंदी) यांचे काल्याचे कीर्तन सेवेने या कार्यक्रमाची सांगता झाली, त्यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व कै. पांडुरंग खंडुजी जगताप पाटील, चंद्रभागा पांडुरंग जगताप, लोकनेते लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांच्या स्मरणार्थ काल्याचा महाप्रसादाचा देण्यात आला. यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभाचे आयोजन श्री भैरवनाथ मंदीर, श्री क्षेत्र पिंपळे गुरव, यांच्या वतीने करण्यात आले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…