Categories: Uncategorized

सावधान ! आता… पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर

सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत दोन खाजगी संस्थेची नेमणूक

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१४ फेब्रुवारी :  – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहराच्या सौदर्य व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर असते. त्यासाठी महापालिका वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून आता शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडा-रोडा, प्लास्टिक, शहरात आरएमसी प्लॉटमधून होणारे हवेचे प्रदूषण, बांधकामाच्या ठिकाणी होणारा कर्कश आवाज, शहरात होणारे ध्वनी प्रदूषण, घर बांधकाम करतांना घराच्या बाहेर टाकला जाणारा राडारोडा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महापालिका २४x७ करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने मे शुभम उद्योग प्रा. लि. व मे. सैनिक इंटलिजन्स अँड सिक्युरिटी प्रा. लि. या संस्थेची स्वतंत्रपणे नेमणूक केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात पर्यावरणाची हानी करणाऱ्या कंपन्या किंवा समाजकंटकांवर महापालिका या संस्थेमार्फत लक्ष ठेवणार असून पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिका हद्दीमध्ये स्थानिक नागरिक किंवा अज्ञात नागरिक रस्त्यांच्या कडेला नदी नाले यांच्या कडेला अनधिकृत भराव व बांधकाम राडा-रोडा टाकतात. सार्वजनिक ठिकाणी घनकचरा टाकणे परिसर अस्वच्छ ठेवणे, रस्ते पदपथावर घाण- कचरा करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे, सार्वजनिक सभा संपल्यानंतर साफसफाई न करणे, जीव वैद्यकीय घनकचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा उपयोग करणे, मोकळ्या जागेवर अस्वच्छता ठेवणे, डास उत्पन्न करणाऱ्या जागा निर्माण करणे, तसेच लहान उद्योजक कारखानदार सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात किंवा नदी पात्रात सोडतात. या सर्व कारणांमुळे महानगरपालिका परिसरात अस्वच्छता पसरते. परिणामी पर्यवरण हानी होते.

नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पुढाकारतून पर्यावरण हानी रोखण्यासाठी मे. शुभम उद्योग प्रा. लि. व मे. सैनिक इंटलिजन्स अँड सिक्युरिटी प्रा.लि. या संस्थेची नेमणूक केली आहे.

सदर संस्थेमार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील बांधकाम व्यवस्थापन २०१६, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६, बांधकाम राडा रोडा मार्गदर्शन तत्वे, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन तत्वे, ई- कचरा व्यवस्थापन नियम २०२२, प्लास्टिक व्यवस्थापन नियम २०२२ इत्यादी नियम व अधिनियमानुसार वरील दोन्ही पथकांमार्फत २४x७ कारवाई करण्यात येणार आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}
पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिका हद्दीतील नागरिक, कारखानदार, दुकानदार, तसेच सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारे पर्यावरणास हानिकारक कृती करत असाल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने निश्चित केलेल्या धोरणानुसार सदर नागरिक, कारखानदार, बिल्डर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून नियमांचे उल्लघन केल्यास दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेचे सहा हजाराहून अधिक सफाई कर्मचारी दररोज स्वच्छता करत असतात. परंतु शहराचे हे सौदर्य अबाधित राखण्यासाठी फक्त सफाई करून उपयोग नाही तर त्यासाठी नागरिकांचा सहभाग देखील गरजेचा आहे.

शेखर सिंह आयुक्त तथा प्रशासक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आपल्या घरातील कचरा इतरत्र न टाकता योग्य ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक कंपन्यांनी देखील केमिकल मिश्रीत पाणी प्रक्रिया करून नदीत सोडणे आवश्यक आहे. हे जर आपण साध्य झाले तर आपल्या शहराचे आरोग्य अबाधित ठेवू शकतो.

संजय कुलकर्णी
मुख्य अभियंता
पर्यावरण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
————–

Maharashtra14 News

Recent Posts

आझाद मैदानात पोलीस छावणी, हजारो पोलिसांचा बंदोबस्त… मराठा आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानात ठिय्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28ऑगस्ट :-- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक…

2 days ago

पिंपळे गुरव येथे श्री गजानन महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी व ऋषी पंचमी उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28 ऑगस्ट : पिंपळे गुरव येथील श्री गजानन महाराज यांची ११५ वी…

2 days ago

२५० बेड क्षमतेसह पिंपरी चिंचवड मनपाचे तालेरा रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि…

4 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सोय

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…

5 days ago

अतिरिक्त आयुक्तांनी विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा प्रभागनिहाय घेतला आढावा … पिंपरी चिंचवड महापालिकेची गणेशोत्सवपूर्व तयारी वेगात

महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…

5 days ago

जीवघेण्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा नवी सांगवीतील नागरिकांची मागणी … कुत्र्याच्या चाव्याने महिला ICU मध्ये

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…

5 days ago