{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
ही निवडणूक अतिशय ऐतिहासिक राहिली. कारखाना आर्थिक अडचणीच्या काळात असताना सभासदांनी हा कारखाना सुरक्षितता द्यावा असे आवाहन सुरुवातीपासून करण्यात आले इंदापूर तालुक्यात विरोधकांनी निकराची झुंज दिली मात्र बारामती तालुक्यात विरोधकांचा सुपडा साफ झाला. एकूणच बारामती व इंदापूर तालुक्याच्या 53 गावात जय भवानी माता पॅनलला एकत्रित मतदान मिळत राहिले. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत ही आघाडी कायम राहिली.
गट क्रमांक एक लासुर्णेमध्ये पृथ्वीराज साहेबराव जाचक यांना 11,694 मते मिळाली. त्यांचे निकटचे सहकारी शरद शिवाजी जामदार यांना 10 हजार 529 मते मिळाली. विरोधी छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार संजय निंबाळकर यांना 4850 तर प्रताप श्रीरंग पवार यांना 4197 मते मिळाली. पृथ्वीराज जाचक यांचे मताधिक्य 6400 राहिले.
सणसर या दुसऱ्या क्रमांकाच्या गटात जय भवानीमाता पॅनलचे रामचंद्र विनायक निंबाळकर यांना 10 हजार 929 मतं मिळाली, तर त्यांचे निकटचे सहकारी शिवाजी रामराव निंबाळकर यांना 10 हजार 431 मते मिळाली. विरोधी छत्रपती बचाव पॅनल मधील उमेदवार संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर यांना 5165 मते, तर महादेव शिरसाठ यांना 3197 मते मिळाली. या गटामध्ये मताधिक्य 5764 मतांचे राहिले.
उद्धट या अतिशय महत्त्वाच्या गटामध्ये जय भवानीमाता पॅनलचे उमेदवार पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांना 9672 मते, तर निकटचे सहकारी गणपत सोपान कदम यांना 9297 मते मिळाली. या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या गटात इंदापूरचे माजी सभापती व विरोधी छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार करणसिंह घोलप यांनी निकराची झुंज दिली. त्यांनी 6,961 मते घेतली. छत्रपती बचाव पॅनलचे पॅनल प्रमुख तानाजीराव थोरात यांना 4721 मते मिळाली. संपूर्ण निवडणुकीत करणसिंह घोलप यांनी छत्रपती बचाव पॅनल कडून सर्वाधिक मते घेतली. त्यांचा अपवाद वगळता इतर कोणीही जय भवानीमाता पॅनलला ठोस टक्कर दिली नाही.
अंथुर्णे या चौथ्या क्रमांकाच्या गटात जय भवानी माता पॅनलचे उमेदवार प्रशांत दासा दराडे यांना 11,180 मते मिळाली तर त्यांची निकटचे सहकारी अजित नरूटे यांना 11 हजार 90, विठ्ठल पांडुरंग शिंगाडे यांना 10235 मते मिळाली. विरोधी छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार बाबासाहेब झगडे यांना 4190 मते तर राजेंद्र पाटील यांना 4860 मते मिळाली या ठिकाणी देखील मताधिक्याचे प्रमाण 6240 एवढे राहिले.
सोनगाव गटामध्ये जय भवानीमाता पॅनलचे उमेदवार अनिल सिताराम काटे यांना 11,789 मते मिळाली, त्याचे निकटचे सहकारी बाळासाहेब कोळेकर यांना 11768 तर संतोष मासाळ यांना 18307 मते मिळाली. विरोधी छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार रवींद्र टकले यांना 5482 मते मिळाली. या गटामध्ये मताधिक्याचे प्रमाण 6307 मतांचे राहिले.
गुणवडी या सहाव्या क्रमांकाच्या गटामध्ये जय भवानी माता पॅनलचे उमेदवार कैलास गावडे यांना 11832 मते, निलेश टिळेकर यांना 11563 मते तर सतीश देवकाते यांना 11,261 मते मिळाली. विरोधी छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार नितीन काटे यांना 5434 मते मिळाली.
इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून जय भवानी माता पॅनलचे उमेदवार तानाजी शिंदे यांना ११३५८ मते तर विरोधी छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार संदीप बनकर यांना 5166 मते मिळाली. या ठिकाणी मताधिक्याचे प्रमाण 6191 एवढे राहिले.
भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून जय भवानी माता पॅनलचे उमेदवार योगेश पाटील यांना 11,843 मते मिळाली तर त्यांना पाठिंबा दिलेले उमेदवार व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे यांना लक्षणीय मते मिळाली त्यांनी या मतदारसंघातून प्रचार न करता 4172 मते मिळाली. तुकाराम काळे यांनी जय भवानी माता-पॅनलला पाठिंबा दिला होता. मात्र छत्रपती बचाव पॅनलच्या मतदारांनी त्यांना देखील मते दिली.
ब प्रवर्ग मतदार संघातून जय भवानी माता पॅनलचे उमेदवार अशोक संभाजीराव पाटील यांना 160 मते मिळाली तर त्यांना पाठिंबा दिलेल्या सत्यजित भाऊसाहेब सपकाळ यांना सोळा मते मिळाली.
श्री जयभवानीमाता पॅनेलचे श्री. कैलास रामचंद्र गावडे यांचे शिक्षण : बी.एस्सी ॲग्री असून यांची बहुमतांनी निवड झाली, यावेळी त्यांचे पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजक गोसेवक आदरणीय श्री विजयशेठ पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांनीमाजी कृषी अधिकारी म्हणून शासकीय सेवेत करण्याचा अनुभव शरदचंद्र पाणी वापर संस्था गुनवडी येथ े काम पाहत असताना लोकांच्या अडीअडचणी मार्गी लावण्यासाठी मदत केली. शेती गट साठी मार्गदर्शन करण्यात सक्रीय सहभाग शेतकरी बांधवांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन कार्यक्रमा मध्ये सहभाग सहकार, शेती, क्रीडा, सामाजिक उपक्रमांमध्ये कामाचा अनुभव याची त्यांना मतदान रुपी आशीर्वाद सभासदनी दिला.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…