Google Ad
Uncategorized

मोहन नगर चिंचवड येथे चार महिला बचत गटांची उंच भरारी, एकत्र येऊन केले हळदी कुंकू … श्रीमती मंदा फड व माजी नगरसेविका मीनल यादव याच

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ फेब्रुवारी) : आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी मोहन नगर चिंचवड येथे चार महिला बचत गटांनी एकत्र येऊन हळदी कुंकू कार्यक्रम केला. सदर बचत गटाच्या कार्यक्रमांमध्ये श्रीमती मंदा फड व माजी नगरसेविका मीनल यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सौ.खजिनदार व सौ.कर्पे यांनी सर्वांच्या वतीने आभार मानले.

सदर कार्यक्रमांमध्ये श्रीमती मंदा फड यांनी बचत गट सुरुवात केल्यापासून चा पूर्ण इतिहास सर्वांसमोर ठेवला तसेच बचत गटातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर थोडे थोडे करून आतापर्यंत जमा झालेल्या 70 ते 80 हजार रुपये प्रत्येकीच्या खात्यात आहेत तसेच बचत गटामार्फत बचत गटातील सदस्यांना देण्यात येणाऱ्या कर्ज यातून सभासदांच्या अडचणीच्या वेळी झालेली मदत, काही नवीन खरेदी, घरातील काही कार्यक्रमांमध्ये त्यांना याबाबत झालेली मदत या सर्व गोष्टींच्या आधारावर तसेच बँकेतील असलेल्या रकमेवर बँकेकडून मिळालेल्या व्याजानुसार गतवर्षी सर्व बचत गटातील सदस्यांना पाच ते सहा हजार रुपयांचा धनादेश देखील वाटण्यात आला याची पूर्ण माहिती त्यांनी सांगितली .
तसेच येत्या काळामध्ये शासनाच्या योजनेतून महिला बचत गटांसाठी उद्योग उभारण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला तसेच काही योजना बचती बाबतीत बँक अधिकाऱ्यांमार्फत देखील मिटींगचे आयोजन करून त्याबाबतीत देखील त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाण्याबाबत त्यांनी सुचविले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!