महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या भागांत अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्यांकडून माणसांवर हल्ल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. निर्बिजीकरण करून त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाते.
पिंपळे गुरव आणि नवी सांगवीच्या गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. याच कुत्र्यांनी आपला मोर्चा आता पिंपळे गुरव येथे असणाऱ्या राजमाता जिजाऊ उद्यानाकडे वळवला आहे. आता नागरिकांच्या बरोबर कुत्रीही उद्यानात फिरायला येताना दिसत आहेत. राजमाता जिजाऊ उद्यानात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने लहान मुले, महिला ,जेष्ठ नागरिक यांच्या जिवाला धोका आहे, या कमी प्रशासनाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे, तर गार्डनची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
रात्रीच्या सुमारास तसेच सकाळच्यावेळी त्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. भटक्या कुत्र्यांनी विद्यार्थीच नव्हे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रात्री भटक्या कुत्र्यांची टोळकी बहुतांश गल्ल्यांमध्ये भ्रमंती करतात. ही टोळकी वाहनांच्या मागे धावल्याने अपघात होऊन वाहनधारकही जखमी झाले आहेत. रात्री विचित्र आवाजात ओरडणे, वाहनांच्या सीट फाडणे, मागे धावणे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगूस या संदर्भातील अनेकदा घटना घडत असतात.
महानगरपालिकेच्या या उद्यानात नारिकांना मोकाट उनाड भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे श्वानांचा बंदोबस्त करा अशी सातत्याने मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्याकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का? असा सवाल नागरिक करत आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…