Categories: Uncategorized

पिंपळे गुरवच्या जिजामाता उद्यानात नागरिकांबरोबरच भटकी कुत्री ही घेतात फिरण्याचा आणि व्यायामाचा आनंद … उद्यान नक्की कोणासाठी?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या भागांत अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्यांकडून माणसांवर हल्ल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. निर्बिजीकरण करून त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाते.

पिंपळे गुरव आणि नवी सांगवीच्या गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. याच कुत्र्यांनी आपला मोर्चा आता पिंपळे गुरव येथे असणाऱ्या राजमाता जिजाऊ उद्यानाकडे वळवला आहे. आता नागरिकांच्या बरोबर कुत्रीही उद्यानात फिरायला येताना दिसत आहेत. राजमाता जिजाऊ उद्यानात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने लहान मुले, महिला ,जेष्ठ नागरिक यांच्या जिवाला धोका आहे, या कमी प्रशासनाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे, तर गार्डनची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

रात्रीच्या सुमारास तसेच सकाळच्यावेळी त्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. भटक्या कुत्र्यांनी विद्यार्थीच नव्हे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रात्री भटक्या कु०यांची टोळकी बहुतांश गल्ल्यांमध्ये भ्रमंती करतात. ही टोळकी वाहनांच्या मागे धावल्याने अपघात होऊन वाहनधारकही जखमी झाले आहेत. रात्री विचित्र आवाजात ओरडणे, वाहनांच्या सीट फाडणे, मागे धावणे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगूस या संदर्भातील अनेकदा घटना घडत असतात.

महानगरपालिकेच्या या उद्यानात नारिकांना मोकाट उनाड भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे श्वानांचा बंदोबस्त करा अशी सातत्याने मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्याकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का? असा सवाल नागरिक करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

१५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी …. महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…

2 days ago

पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवड नावाचा समावेश करा – आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…

3 days ago

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

1 week ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

2 weeks ago