शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था यांना गणपती उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी दि.१९ ऑगस्ट २०२५:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था यांना गणपती उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे, सदर ऑनलाईन सुविधेचं हे सलग तिसरे वर्ष आहे, या सुविधेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील तसेच मनपाच्या कार्यक्षेत्राबाहेरील मात्र पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, देहू, आळंदी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, शिरगाव, परंदवाडी, तळेगाव इत्यादी सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणारा परिसर व त्या परिसरातील सार्वजनिक मंडळे या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

सदर प्रक्रियेतंर्गत मंडळातील सभासदाने स्वतःचे खाते महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर http://www.pcmcindia.gov.in उपलब्ध असलेल्या गणेश उत्सव मंडप परवानगी 2025 या लिंक वर तयार करणे करणे आवश्यक आहे, सदर खाते तयार करताना मोबाईल ओटीपी द्वारे खात्यावरील मोबाईल नंबरची नोंद घेतली जाईल, प्रथमता मंडळ हे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आहे अथवा नाही हे नोंदवणे आवश्यक आहे जेणेकरून त्या त्या प्रकारचे आवश्यक कागदपत्रे यांची मागणी संगणक प्रणाली मार्फत केली जाऊ शकते, मनपाच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग व ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नोंदणी केली जाणार आहे, संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य विभाग सर्वप्रथम ना हरकत दाखला देईल, व त्यानंतरच संगणक प्रणाली अंतिम दाखला मंडळांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहे.

महानगरपालिकेकडून ना हरकत दाखला मिळाल्यानंतरच पोलीस आयुक्त कार्यालयाची प्रक्रिया सुरू होणार आहे, ज्या अर्जाना महानगरपालिका अंतिम ना हरकत दाखला देते तीच प्रकरणे ही पोलिसांकडे संगण संगणक प्रणाली द्वारे फॉरवर्ड केली जाणार आहेत, मनपाच्या ना हरकत दाखल्यानंतर पोलिसांकडून संबंधित अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्या त्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वाहतूक विभागाकडे वर्ग केला जाणार आहे, वाहतूक विभागाच्या ना हरकत दाखल्यानंतर पोलीस कार्यालयाकडील अंतिम परवानगी मंडळास उपलब्ध होईल, मनपाच्या कार्यक्षेत्रा बाहेरील सर्व गणेश मंडळांना अर्ज करताना प्रथमतः तेथील नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती यांकडील ना हरकत दाखला मिळवणे आवश्यक आहे, अर्ज करताना मंडळाने अध्यक्ष, अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचे छायाचित्र, मोबाईल क्रमांक तसेच देखाव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती संगणक प्रणालीमध्ये पुरविणे आवश्यक आहे, गणेश स्थापना व तसेच गणेश विसर्जन मिरवणूक यांच्या मार्गाची नोंद करणे तसेच त्यामध्ये वापरली जाणाऱ्या वाहनांची संख्या, देखावा, विद्युत रोषणाई इत्यादींची माहिती देखील नोंदविणे क्रमप्राप्त आहे, मनपाच्या भूमी व जिंदगी विभागामार्फत देण्यात येणारी ही सुविधा सर्व सार्वजनिक गणेश मंडळास विनाशुल्क पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

 

पोलीस आयुक्त कार्यालय व महानगरपालिका यांच्या एकत्रित संकल्पनेतून ही संगणक प्रणाली बनवण्यात आली असून मंडळांना कमीत कमी वेळेमध्ये दोन्ही कार्यालयाकडील ना हरकत दाखले लवकरात लवकर उपलब्ध उपलब्ध व्हावेत, मंडळांना कोठेही सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारावयास लागू नयेत या प्रमुख उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरीही जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळे व गृहनिर्माण संस्था यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.

*शेखर सिंह,आयुक्त*
प्रशासक तथा मनपा आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कायमच ऑनलाईन सेवा सुविधांमधे नवनवीन गोष्टींचा समावेश करण्याबाबत पुढाकार घेतलेला आहे, गणपती मूर्ती विक्री संबंधीची जे स्ट्रॉल आहेत त्यावर शाडू माती की प्लास्ट्रर ऑफ पॅरिस कोणत्या प्रकारची मूर्ती विक्री होणार आहे याची देखील माहिती महानगरपालिकेला या माध्य‌मातून मिळणार आहे

*-निळकंठ पोमण*
मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी

*गणपती मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची ऑनलाइन पद्धतीने नोंद घेणे..*

गणपती मूर्ती विक्री करण्यास महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातून विक्रेत्यांना ना हरकत दाखला दिला जातो, गणेश विक्री करणारे स्टॉल हे शहरातील विविध भागांमध्ये खाजगी तसेच सार्वजनिक जागेत उभारले जातात, सदर सुविधा ही आजपासून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर सेवेस आवश्यक कागदपत्रे व ना हरकत दाखल्याचे शुल्क हे अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून सर्व विक्रेत्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे, सदर ना हरकत दाखल्यावर क्यूआर कोड असल्याने महानगरपालिकेच्या अधिका-यास अर्जाची सत्यता पडताळण्यास मदत होणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

निगडीतील हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या इसमाचा थरारक बचाव.. अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ एप्रिल २०२६ :-* निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी…

4 days ago

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ असा सन्माननीय दर्जा प्राप्त व्हावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरासह ५५०० तालुक्यांमध्ये … ‘गो सम्मान’ आव्हान अभियान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 एप्रिल : संपूर्ण भारतात गोहत्या बंद व्हावी आणि गोमातेला 'राष्ट्रमाता' असा…

1 week ago

शंकर जगताप यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयटीयन्सच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक;आयटीयन्ससाठी सकारात्मक निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज, २१ एप्रिल : हिंजवडी तसेच राज्यातील आयटी पार्कमधील आयटीयन्सच्या नोकरीची असुरक्षितता, 'ले-ऑफ'च्या…

2 weeks ago

एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार — आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी … लघुउद्योग व उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक

*एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी* *लघुउद्योग व उद्योग…

2 weeks ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतच्या भव्य-दिव्य वास्तूची प्रत्यक्ष भाजप पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…

2 weeks ago