Google Ad
Uncategorized

मराठमोळी अभिनेत्री ‘गौरी सावंत’ चे ” मला नाचायचं ! आपल्याच लग्नात ” धडाकेबाज गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०२ डिसेंबर) : सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील खळे शिद्रुकवाडी गावात एका अल्बम साँगचे नुकतेच शुटिंग झाले . तसं खळे गाव पहिल्या पासून सर्वांच्या परिचयाचे आहे . कारण या गावातून अनेक मराठी फिल्म व गाणी तयार झाली आहेत . निर्माते अरुण कचरे यांनी अनेक फिल्म – गीत या गावात शुटिंग केली आहेत . गौरी सावंत ही याचं गावची असुन तीने एका अल्बम साँगची निर्मिती केली आहे.

हे एक लग्न गीत आहे . पुर्वीच्या काळी दारातील ( मंडपातील ) लग्नाची मजा काय और होती . लग्नातील काही परंपरा , चा सध्या सर्वजण विसरून चालले आहेत , लग्न ठरलं की पहिले मंगलकार्यालय कधी रिकामं आहे पाहून लग्नाची तारीख जाहीर केली जाते आणि सकाळी हळदीने पिवळे होऊन लग्न करून मोकळे व्हायचे यावरती आधारीत , ” मला नाचायचं !, आपल्याचं लग्नात ! ” हे गीत तयार केले आहे . या गीताच्या माध्यमातून परंपरा चालीरीतीचे दर्शन नव्या पिढीला बघायला आवडेल आणि नवी पिढी परंपरेवर प्रेम ही करतील . याची झलक या गाण्यातून पहायला मिळेल , पण हे गाणं लागताच समोरचा व्यक्ती नाचायला लागले अशी गाण्याची चाल असुन हे गाणे महाराष्ट्रात ही आणि इतर ही राज्यात वाजेल गाजेल याची खात्री वाटते .

Google Ad

निर्माता- आशिष सावंत , दिग्दर्शक संजय पाटील , सहायक स्वप्निल पाटील असून कलाकार गौरी सावंत , शुभम मांढरे स्टार डान्सर आहे आणि इतर ही कलाकार स्टार असुन हेमंत पाटील , ऍड . अनिता वरेकर , सुनील परदेशी , रणजित परमार , आनंद धुमाळ , विठ्ठल काटेकर , असून कॅमेरा DOP विनायक चौगुले आहेत . गायक संगीत , मिलिंद धनेगावकर व संध्या धनेगावकर यांचे आहे . या गाण्याचे Remix निलेश NS Studio Pune यांनी केले आहे . सहकार्य ग्रामस्थ , ग्रामपंचायत शिद्रुकवाडी तसेच हनुमान तरुण मंडळ शिद्रुकवाडी आणि सरपंच महेश शिद्रुक , माजी सरपंच महादेव जाधव , रमेश जंगम ,

मोहण जाधव , ज्ञानदेव ठिक , प्रमोद साळुंखे , रमेश रजपूत , कृष्णात घागरे दादासाहेब मानकर , समाधान कचरे पाटील , सतीश कचरे , यांनी या गीतासाठी सहकार्य केले . विषेश सहकार्य वैभव गोरे सर माढा , बाबुराव आगलावे लातूर , संजय खुळे पाटील परभणी , आणि आपल्याला नक्कीच आवडेल असे अल्बम साँग ” मला नाचायचं ! आपल्याचं लग्नात ! आणि लग्न तुमचं 100 वाजणार गाणं आमचं , संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालणार आहे . लवकरच येत आहे आपल्या भेटीला !

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!