महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.0१ सप्टेंबर) : रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड शहरातील डॉल्फिन स्कूल सांगवी या ठिकाणी सौ सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने पर्यावरण पूरक शाडू माती श्री गणेश बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये सांगवी परिसरातील सुमारे 148 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला .दीप प्रज्वलन व गणपती स्तोत्र यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी पर्यावरण जतन करण्याचा संदेश देण्यासाठी गणेशोत्सवा निमित्त पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सांगावीत यास मोठा प्रतिसाद मिळाला. यातूनच पुढे अनेक कलाकार निर्माण होऊ शकतात.
सौ सारिका कृष्णा भंडलकर यांनी प्रास्ताविक केले व श्री कृष्णा भंडलकर यांनी आभार प्रदर्शन केले श्री योगेंद्र कातुरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. आपली सांस्कृतिक परंपरा टिकविण्यासाठी आपल्या मुलांना त्यांची माहिती व्हायला हवी.आपले सण त्यांनी साजरे करायला हवेत. आपल्या देवतांबद्दल त्यांना माहिती व्हायला हवी ,या उद्देशाने मुलांमधील सर्जनशीलता वाढावी त्यांनी मातीमध्ये खेळावं यासाठी पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या शाडू माती पासून गणपती बनविण्याची कार्यशाळा सौ सारिका कृष्णा भंडलकर यांनी घेतली. मुलांबरोबरच पालकांनीही या कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला व अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पुढील महिलांनी सहभाग नोंदवला पल्लवी गरुड, साक्षी वाघमारे ,शितल शीलवंत, मंगला चव्हाण, कुमुद वाघमारे,सुमेधा पाटील ,दिपाली, निलंगे, शर्मदा मंगलगे ,मनीषा बिरादार ,नीता सेगल,संस्कृती नेटके, रश्मी कंद , संगीता प्रधान, विद्या पाटील, सोनिया खेळे आणि विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक मूर्त्यांमध्ये शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तीचा समावेश होतो. मातीमध्ये कोणत्याही प्रकारची विषारी द्रव्ये नसतात. या मातीपासून बनविलेल्या मूर्ती पाण्यात विरघळून जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…