Categories: Editor Choice

स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारा डोंगरावर होणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरास .… दीड कोटी रुपयांच्या देणगीसह अनोखी श्रद्धांजली

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जानेवारी  २०२३) : आज दि.१२ जानेवारी रोजी दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचा दशक्रिया विधी पिंपळे गुरव येथे संपन्न झाला. यावेळी गहनीनाथ महाराज औसेकर यांची प्रवचन रुपी सेवा होती यात महाराजांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली, त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाजसेवेचे अविरत कार्य करीताना आपल्या धर्मासाठी खूप मोठी दानधर्माची सेवाही केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारा डोंगरावर होणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरास एक कोटी तीस लाख रुपयांच्या देणगीसह अनोखी श्रद्धांजली त्यांचे नातेवाईक व त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने वाहण्यात आली.

आज यावेळी उपस्थित असलेल्या जनसागरावरून त्यांच्यावर जनतेचे, गोरगरिबांविषयी असणारे प्रेम दिसून येत होते. यावेळी ह भ प औसेकर महाराज, नगरसेवक शशिकांत कदम, आमदार महेशदादा लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, सर संघ चालक विनोदजी बन्सल, दादा वेदक, सुनील टिंगरे, खासदार श्रीरंग बारणे, लहवितकर महाराज, पंकज महाराज गावडे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे यावेळी दिसत होते. त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

देश देव आणि धर्माशी एकनिष्ठ राहून वाटचाल करणारे लक्ष्मण भाऊ, आपल्यातुन गेले. भाऊंनी केलेले कार्य आणि त्यांचा सारखा प्रभावी लोकनेता या परिसरात निर्माण होणे कठीण आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ मे २०२६ –* मान्सून कालावधीत संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे…

2 weeks ago

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22 मे -- ​पिंपरी-चिंचवड: पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण…

3 weeks ago

सोसायटीवरील ‘ॲमिनेटीज्‌’ कर आकारणी रद्द करा! – चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची मागणी – महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 मे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून सोसायट्यांमधील…

3 weeks ago

तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 मे (प्रतिनिधी)  : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये…

4 weeks ago

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा…

1 month ago