पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यानात रक्तदानाचा अनोखा उपक्रम … अनेकांनी जपली आपली सामाजिक बांधिलकी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ जुलै) : कोरोना साथीच्या आजारामुळे अनेक रुग्णालयात रक्तपेढीतील रक्त साठा कमी झाला आहे. या कठीण काळात, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक आणि रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. कारण रक्ताची पूर्तता केवळ रक्तानेच शक्य आहे. रक्तपेढीमध्ये रक्त असल्यासच रुग्णाला वाचवता येते.

थॅलेसीमियाने ग्रस्त अनेक मुले आहेत. त्यांना दररोज सुमारे 10 युनिट रक्ताची आवश्यकता असते, तसेच अनेक आजार, अपघाती, आणीबाणीच्या प्रकरणांसह आणि इतरांनाही दररोज रक्ताची आवश्यकता असते. रक्ताची कमतरता लक्षात घेऊन या कठीण परिस्थितीत मुलांना व गरजूंना मदत करण्यासाठी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्याला अनेक रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

राजमाता जिजाऊ उद्यान ग्रुप तर्फे पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले . याप्रसंगी ग्रुपमधील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिरासाठी पिंपरी येथील पी एस आय रक्तपेढी च्या डॉक्टरांनी सहकार्य केले . आयोजनामध्ये प्रसाद जाधव आणि मुन्ना भाई आणि अन्य सदस्यांनी हिरीरीने सहभाग घेतला . डॉक्टरांनी रक्तदान करणे का महत्वाचे आहे त्याच्याबद्दल माहिती दिली समारोप प्रा . उमेश बोरसे यांनी केला .

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago