पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसदस्या अर्चना बारणे यांच्या निधनामुळे महानगरपालिकेच्या वतीने श्रध्दांजली….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ जुलै २०२१) : नगरसदस्या अर्चना बारणे यांच्या निधनामुळे शहराने एक उत्तम लोकप्रतिनिधी गमावला असल्याची भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसदस्या अर्चना बारणे यांचे दि. १३ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.  महापालिकेच्या वतीने महापौर माई ढोरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  त्यांना श्रद्धांजली वाहताना महापौर माई ढोरे यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अ प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, नगरसदस्य केशव घोळवे,  नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, प्रियांका बारसे, अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, उपसंचालक नगररचना प्रभाकर नाळे, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रमुख किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या नगरसेविका अर्चना बारणे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम कार्य केले, प्रभाग क्र. २३ मधून निवडून आल्यानंतर त्यांनी ग प्रभाग अध्यक्षा पदाची जबाबदारी देखील सक्षमतेने पार पाडली.  लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.  अधिक ऊर्जा आणि सदृढ आरोग्य असेल तर आपण अधिक गतीने काम करु शकतो.

ब-याचदा स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष देखील होते.  जीवन अनमोल आहे यासाठी सर्वांनी आरोग्याची काळजी प्राधान्याने घेतली पाहिजे.  सध्या कोरोनाची साथ सुरु आहे.   कोरोनामुळे महापालिकेचे ३ लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचा-यांसह काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे आरोग्यासाठी हितावह आहे असे सांगून महापौर माई ढोरे यांनी प्रत्येकाने दक्षता बाळगून आरोग्याबाबत सजग रहावे असेही त्या म्हणाल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

10 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

17 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago