Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातील देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे  येथे होर्डिंगचा आसरा घेणे बेतले जीवावर, 5 जण ठार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे  येथे एक होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. ही दुर्घटना आज सायंकाळच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले.

पिंपरी चिंचवडमध्ये ही दुर्घटना घडली आहे. आज सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे एक मोठा होर्डिंग बोर्ड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेत 3 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानंतर काही नागरिक आसरा घेण्यासाठी म्हणून होर्डिंगच्या खाली थांबले होते. मात्र तोच होर्डिंग कोसळल्यामुळे यावेळी 5 जणांवर काळाने घाला घातला.

Google Ad

किवळे भागात सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे रस्त्याच्या बाजूला लावलेले एक होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली येऊन पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती मिळताच रावेत पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने पडलेले होर्डिंग बाजूला करण्यात आले. रेस्क्यू पथकाने होर्डिंग खाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

आतापर्यंत चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दोन महिलांसह तिघे जण गंभीर आहेत. मदत कार्य़ पूर्ण झाल्यानंतर जखमी आणि मृतांचा निश्चित आकडा समजेल.

मृतांची नावे
भारती मंचळ (वय-30 रा. शितलनगर, देहूरोड)
शोभा विनय टाक (वय-50, रा. पारशी चाळ, देहूरोड)
अनिता उमेश रॉय (वय-45 रा. देहूरोड)
वर्षा केदारे (वय-40 रा. शितलनगर, देहूरोड)
राम प्रल्हाद आत्मज (वय-20, उत्तर प्रदेश)

जखमींची नावे
रहमद मोहमद अंसारी (वय-21 रा. किवळे)
विशाल शिवशंकर यादव (वय-20 रा. उत्तर प्रदेश)
रिंकी दिलीप रॉय (वय-45 रा. देहूरोड)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!