Google Ad
Uncategorized

रत्नागिरी : गोशाळा वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेले कोकरे महाराज बेशुद्ध … उपोषण सुरूच

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : रत्नागिरी – जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थानच्या गोशाळेमध्ये एक महिन्यापासून १८ गायींचा मृत्यू झाला आहे.गोशाळेचे रखडलेले अनुदान आणि जागेचा प्रश्न यांमुळे गोशाळेचे संचालक आणि कीर्तनकार ह.भ.प. भगवान कोकरे महाराज हे उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाला आता ७ दिवस झाले आहेत. या उपोषणाच्या कालावधीत अनेक गायींचा मृत्यू झाला आहे.

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थानच्या या गोशाळेमध्ये ११०० गायी आहेत. वर्ष २००८ मध्ये कसायाकडे जाणार्‍या गायींना वाचवण्यासाठी, तसेच महामार्गावर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गायींना निवारा देण्यासाठी ही गोशाळा बांधण्यात आली. वर्ष २०१७ मध्ये या गोशाळेसाठी महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्राकडून १ कोटी रुपयांचा निधी संमत झाला. गेल्या ४ वर्षांपासून संमत झालेल्या निधीपैकी उर्वरित २५ लाख रुपये शासनाकडून अद्याप गोशाळेला मिळालेले नाहीत. त्यामुळे गायींच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या गोशाळेतील गायींवर उपासमारीची वेळ आली आहे. गोशाळेचे रखडलेले अनुदान मिळावे, गोशाळेसाठी एम्.आय.डी.सी. विभागाकडून भाडेतत्त्वावर भूमी मिळावी, याकरिता हे उपोषण सुरू आहे. गोशाळा वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेले कोकरे महाराज शनिवारी बेशुद्ध पडले असून, त्यांचे उपोषण सुरूच आहे.

Google Ad

देहूच्या वारकरी संप्रदायाने कोकरे महाराजांची शनिवारी भेट घेतली आहे. सरकार या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे, याकडे लक्ष देण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.

दुसरीकडे शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून या गोशाळेविषयी आक्षेप घेण्यात आले आहेत. त्या संदर्भात शासनाकडून नोटीसही गोशाळेला देण्यात आली आहे.

लोटे (ता. चिपळूण) येथील गोशाळा प्रकरणी उद्योग मंत्रालय योग्य प्रक्रिया राबवत असून गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.असे असताना कोकरे करत असलेले उपोषण योग्य नाही. त्यांनी ते मागे घ्यावे, असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!