Google Ad
Uncategorized

नवी सांगवीतील, दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज,(दिनांक- २८ मार्च २०२३) : येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित , दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या स्कूलच्या सदस्या स्वाती पवारमॅडम अध्यक्षस्थानी होत्या.

उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.सुरवातीस विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले.मयूर सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विज्ञान दिवसाचे महत्व अत्यंत सुंदर अशा शब्दात व्यक्त केले. नचिकेत पोरे, आमेय शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर विनोद शिंदे यांनी हल्लीच्या धावपळीच्या युगात विज्ञानाला किती महत्त्व आहे, हे स्पष्ट केले. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रकल्प प्रदर्शन बघितले.

Google Ad

यात पाणी गजर प्रकल्प, प्रोजेक्टर होलोग्रम, हायड्रोइलेक्ट्रिक पावर प्लांट,एटीएम मशीन, भूकंप मापक, रक्त शुद्धीकरण प्रकल्प, पवन चक्की, ज्वालामुखी, या प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे सर्व बघून मान्यवरांनी या मुलांचे खूप कौतुक केले व पुढे जाऊन यातून एक जरी शास्त्रज्ञ झाला तरी शाळेचा नावलौकिक वाढवून शिक्षकांच्या कष्टाचे चीज होईल पण, त्यासाठी सर्वांनी खूप खूप अभ्यास करून अशीच विज्ञानाची कास धरावी व प्रगतीकडे वाटचाल करावी असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव शंकर जगताप, विजू अण्णा जगताप, सदस्य स्वाती पवार मॅडम , देवराम पिंजण तसेच प्राचार्या मुजावर मॅडम, सर्व शिक्षकवृंद, हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निता देशमुख, भावना पाटील व इतर माध्यमिक शिक्षक वृंद यांनी कष्ट घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बनसोडे या विद्यार्थिनींने केले तर आभार रिया धोंडीने मानले अशाप्रकारे एका नव्या उमेदीने नव्या प्रेरणेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!