Google Ad
Editor Choice Education

परीक्षा पे चर्चा ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ यांच्या कार्यक्रमात नवी सांगवीतील न्यू मिलेनियम स्कूल च्या विद्यार्थ्यांचा सहभाग…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जानेवारी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेच्या वेळात तणावाचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. तणाव आणि परीक्षेची भीती दूर करण्यासाठी या लाईव्ह संवादात्मक ‘परीक्षा पे चर्चा’ सत्रादरम्यान पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.  नवी सांगवीतील द न्यू मिलेनियम स्कूल मध्ये ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. द न्यू मिलेनियम स्कूल मध्ये परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबर संस्थेचे सदस्या मा.स्वाती पवार, कॉलेजच्या प्राचार्या मा. इनायत मुजावर, सर्व शिक्षक आणि भाजप सांगवी काळेवाडी मंडलपदाधिकारी तसेच माजी नगरसेवक सागर अंगोळ कर, अंबरनाथ कांबळे, राहुल जवळकर, अमरसिंग आदियाल आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

परीक्षेबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तालकटोरा स्टेडियमवर पोहोचले. तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.मुलांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्सच्या प्रदर्शनाची पाहणी केली. परीक्षेवर चर्चा कार्यक्रम सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.परीक्षेवर चर्चा ‘ माझीही परीक्षा आहे आणि देशातील कोट्यवधी विद्यार्थी माझी परीक्षा देत आहेत… ही परीक्षा देताना मला आनंद होतो आहे, असे पंतप्रधान यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले.

पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही चांगले काम केले तरी प्रत्येकाला तुमच्याकडून नवीन अपेक्षा असतील… सर्व बाजूंनी दबाव आहे, पण या दबावाला बळी पडायचे का? त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या कार्यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्हीही अशा संकटातून बाहेर पडाल. कधीही दबावाखाली राहू नका.

पीएम मोदी म्हणाले की, कुटुंबांना त्यांच्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु जर ते फक्त ‘सामाजिक दर्जा’ राखण्यासाठी असेल तर ते धोकादायक आहे. केवळ परीक्षेसाठीच नाही तर जीवनातही आपण वेळेच्या व्यवस्थापनाबाबत जागरूक असले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. वेळेवर कामे होत नसल्याने कामे रखडतात. काम करताना कधीच कंटाळा येत नाही, काम करताना समाधान मिळतेपंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले दबावाखाली येऊ नका! विचार करा, विश्लेषण करा, कृती करा आणि मग तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुमचे सर्वोत्तम द्या.पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, केवळ परीक्षेपुरतेच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण वेळेच्या व्यवस्थापनाची जाणीव ठेवली पाहिजे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मास्टर क्लाससाठी नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!