Google Ad
Uncategorized

दारू पिण्याचा दिलेला सल्ला अखेर डॉक्टरला भोवला … शासनाने घेतली, अशी अकॅशन …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ नोव्हेंबर) : करोना रुग्णांना दारू दिल्यास ते बरे होतात, असा दावा करणारा डॉक्टर सेवेतून कार्यमुक्त करण्यात आला आहे. कोरोनावरील उपचारासाठी दारू पिण्याचा त्याने दिलेला सल्ला अखेर त्यालाच
भोवला आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण भिसे यांनी कोरोना काळात चुकीचे वक्तव्य केल्याने अहमदनगर जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी डॉ. भिसे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे.या कारवाईची शासकीय वैद्यकीय विश्‍वात जोरदार चर्चा आहे. निवासी उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, अहमदनगर) यांच्या पत्रानुसार डॉ.अरुण भिसे वैैद्यकीयअधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या वक्तव्याची सखोल चौकशी करण्याबाबत पत्र प्राप्त झाले होते. त्या नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद,अहमदनगर) यांच्या मंजूर टिप्पणीनुसार डॉ.अरुणभिसे वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे.

Google Ad

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे यांनी कोरोना काळात चुकीचे वक्तव्य केल्यानेनिवासी उपजिल्हाधिकारी व अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधीकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरुन अहमदनगर जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी डॉ. भिसे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे.

कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्याबाबत वैद्यकीय विश्‍वातही संभ्रमाचे वातावरण होते. रेमडीसिवीर इंजेक्शन, विविध प्रकारच्या गोळ्या यासह युनानी व आयुर्वेदिक काढेही चर्चेत होते. सोशल मिडियात तर यावर अनेकविध वैद्यकीय सल्ले दिले जात होते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. भिसे यांनी कोरोना रुग्णांना दारू दिल्यास ते बरे होतात, असे केलेले वक्तव्य जिल्हाभरात नव्हे तर राज्यभरात गाजले. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यावर सेवामुक्तीची कारवाई झाल्याने तीही आता चर्चेत आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

49 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!