Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापती पदाकरीता सौ माधवी राजेंद्र राजापुरे यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने एकमेव उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ नोव्हेंबर) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक 18 नोव्हेंबर 2021 रोजी होणार त्यासाठी चे अर्ज आज भाजपच्या वतीने दाखल करण्यात आले.

सभापतीपदासाठी आज शुक्रवारी (दि.12) दुपारी 3 ते 5 या वेळेत नगरसचिव कार्यालयात अर्ज भरण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे हे अर्ज सादर करण्यात आले.

Google Ad

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापती पदाकरीता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या सौ माधवी राजेंद्र राजापुरे यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर सौ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेता श्री नामदेव ढाके आणि इतर सदस्य उपस्थीत होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक बलाबल असल्याने सर्वंच समित्यांमध्ये भाजपचेच सभापती होणार हे निश्चित आहे. त्यानुसार महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीत महासभेत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली त्यातील प्रत्यकी एकाचाच अर्ज आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे दाखल झाला.

यामध्ये शिक्षण समिती सभापती- माधवी राजापुरे, महिला व बालकल्याण सविता खुळे, क्रीडा , कला व सांस्कृतिक समिती – उत्तम प्रकाश केंदळे, शहर सुधारणा समिती- अनुराधा गणपत गोरखे तर विधी समिती करीता स्वीनल कपिल म्हेत्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.

त्यामुळे सत्ताधारी भाजपचे बलाबल असल्याने सर्वंच समित्यांमध्ये भाजपचेच सभापती होणार हे निश्चित आहे. आता महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवड होण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!