महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३१ जुलै २०२५ :* महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील १९ जानेवारी २०२१ व १५ डिसेंबर २०२२ च्या शासननिर्णयानुसार ५७ सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. या सेवा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र नियंत्रित खासगी स्वरुपात देण्यात आलेल्या ९४ नागरी सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पुरविल्या जातात. आता मा. मुख्यमंत्र्यांच्या १५०-दिवसीय महत्त्वाकांक्षी कृती आराखड्याचा अनुषंगाने या सेवांचा लाभ नागरिकांनी थेट ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. यासाठी नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
*अशी करा नोंदणी*
– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर येऊन नागरिकांनी सर्वप्रथम स्वतःचे खाते तयार करायचे आहे. ही प्रक्रिया फक्त एकदाच करावी लागेल, यामध्ये ओटीपी द्वारे नागरिकाचा मोबाईल नंबर हा तपासून संग्रही केला जाईल.
– आपल्या खात्यामध्ये नागरिकांनी लॉगिन केल्यानंतर संबंधित सुविधेला नागरिक अर्ज करू शकतात. यासाठी लागणारे कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
– ऑनलाईल सेवेसाठी नागरिकांना रु.५०/- हे शुल्क आकारले जाणार नाही. जर नागरिक हि सेवा नागरी सुविधा केंद्रामार्फत घेत असल्यास नागरिकांना सेवेचे पुर्ण शुल्क (रुपये ५०/-) भरणे आवश्यक आहे. शुल्काची रक्कम भरल्यास ती प्राप्त झालेबाबत नागरिकांना एसएमएस द्वारे मेसज देण्याची सुविधा पुरविणेत आलेली आहे.
– अर्ज यशस्वीरित्या मनपाकडे सुपूर्त झाल्यानंतर त्या अर्ज क्रमांकाची नोंद ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून पुढील तपासणीस तो अर्ज क्रमांक महत्त्वाचा असेल.
– एखाद्या सशुल्क सेवेचा लाभ नागरिकांना घेणे कामी अर्ज करत असतानाच सदर सेवेची पूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे
– सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेकडून देणारा अंतिम दाखला हा ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करून घेण्यास उपलब्ध केला जाणार आहे.
*नागरी सुविधा केंद्राद्वारे प्रक्रिया झालेले अर्ज*
पिंपरी चिंचवड महापालिकेने मागील दोन वर्षांत नागरी सुविधा केंद्रांद्वारे १ लाखांहून अधिक अर्ज प्रक्रिया केले आहेत. यामध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रक्रिया झालेल्या अर्जाची संख्या ७७ हजार ७७३ एवढी असून त्याद्वारे १८७ कोटी ५८ लाख रुपये संकलन झाले आहे. तर, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रक्रिया झालेल्या अर्जाची संख्या २३ हजार ३८३ असून त्याद्वारे ४२ कोटी १५ लाख रुपये संकलन झाले आहे.
……
मुख्यमंत्री १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखडयानंतर आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी १५० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे नागरिकांना अधिक चांगल्या सेवा प्रदान करणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलणे, हा आहे. सदर कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवाहमी कायदयांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या ५७ सेवा १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे. ज्यामुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता राहणार नाही.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
……
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव काळात पिंपरी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…