Google Ad
Uncategorized

संत निरंकारी मिशन द्वारे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ४६६ अनुयायांनी रक्तदान करून दिला मानवतेचा संदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ डिसेंबर) : निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने रविवार दि.२६ डिसेंबर २०२१ रोजी संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन,भोसरी ब्रांच च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे सकाळी ८ ते ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.या मध्ये संत निरंकारी रक्तपेढी चे डॉ. मारुती कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० युनिट, तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी चे डॉ. शंकर मोसलगी यांनी २६६ युनिट रक्त संकलन केले.

शिबिराचे उद्घाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी संत निरंकारी मंडळ ,पुणे), पंडित आबा गवळी (मा. नगरसेवक) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या शिबिरादरम्यान भोसरी-दिघी परिसरातील स्थानिक नगरसेवक, डॉ. राजेंद्र वाबळे,(वैद्यकीय अधिष्ठाता, वाय.सी.एम रुग्णालय) तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. नानी घुले यांनी सदिच्छा भेट दिली, तसेच संत निरंकारी मिशनचे इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
एप्रिल २०२१ पासून पुणे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत संत निरंकारी मिशन तर्फे २० रक्तदान शिबीर संपन्न झाले असून २३७२ युनिट रक्त संकलन ससून रुग्णालय रक्तपेढी, वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी यांच्यामार्फत करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा आवश्यकतेनुसार प्लाझ्मादान करून अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवले.

Google Ad

भोसरी सेक्टर चे प्रमुख अंगद जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मिशनच्या भोसरी सेक्टरच्या सर्व अनुयायांचे योगदान लाभले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!