महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३४ मार्च) : देशातील टॉप टेन खासदारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
देशातील टॉप-टेन खासदारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. त्यात शिवसेनेच्या तीन तर राष्ट्रवादीचा एक खासदार आहे. याशिवाय तामिळनाडूतील दोन, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, झारखंड येथील प्रत्येकी एकेक खासदाराचा यादीत समावेश आहे. या खासदारांच्या यादीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांचा समावेश आहे. श्रीरंग बारणे दुसऱ्या, श्रीकांत शिंदे 8 व्या तर राहुल शेवाळे 9 व्या क्रमांकावर आहेत.
देशातील खासदारांच्या संसदेतील कामगिरीवरून ही टॉप टेन यादी जाहीर करण्यात आली आहे.अहवालामध्ये विविध निकषांवर संसदेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन करून त्यानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात येते. तसेच सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे प्रथम क्रमांकावर आहेत. तर सर्वाधिक खासगी विधेयक मांडणाऱ्या खासदारांमध्ये गोपाल शेट्टी नंबर वनवर आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…