Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात गायक-वादकांचे सूर सजले; रसिकांनी दिली भरभरून दाद

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १८ ऑक्टोबर २०२५ :* प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक झुळुकींनी सजलेली दिवाळीची पहाट… कानात झंकारणारे स्वर, भावनांच्या लहरींनी ओथंबलेले वातावरण… आणि शेकडो संगीतप्रेमींची मिळणारी दाद… अशा संगीतमय वातावरणात मंगलसुरांच्या अभ्यंगस्नानाने रसिकांची दिवाळीची पहाट अविस्मरणीय झाली. आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात सुरांच्या दीपांनी व भावनांच्या शब्दसुरावटीने आजची पहाट उजळली.

भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट २०२५ – दीपबंध सुरांचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी उमा दरवेश, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, नाट्यगृह व्यवस्थापक राकेश सौदे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक बबिता गावंडे, समन्वयक समीर सूर्यवंशी, संगीत शिक्षक नंदीन सरिन, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, संतोष साळवे, उमेश पुरोहित ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, प्रतिभा मुनावत, माजी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.सतिष गोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या सुरेल सोहळ्यात संगीताच्या रेशमी तारा, सुरांच्या लहरी आणि भावनांच्या झंकाराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

“सुर निरागस हो…” या भावगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.ज्यामध्ये गायक-वादकांनी रसिकांच्या मनांवर आपल्या शब्दसुरांनी लहर सोडली. त्यानंतर बंदिशी वादनांनी कार्यक्रमाला गोडवा आणला, तर अभंग आणि भक्तिगीतांनी उपस्थितांची मनं भक्तिरसाने ओथंबली, आणि संगीताच्या लाटांवर रसिकांची मनं तरंगू लागली. गायक कोमल कृष्णा, राजेश्वरी पवार, विनल देशमुख, गणेश मोरे यांनी ‘शोधी सी मानवा’, ‘सूर तेच छेडीता’, ‘अधीर मन झाले’, ‘बहरला हा मधुमास नवा’, ‘पिया तो से नयना लागे रे’, ‘ये हसी वादिया’, ‘मेरे ढोलना सुन’…अशी विविध मराठी आणि हिंदी गीतं सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगातून भक्तिरसाची पेरणी केली. ‘माऊली माऊली रूप तुझे’ या गाण्याच्या सुरांनी संगीतमय तोरण चढवले, आणि रसिकांचे मन मंत्रमुग्ध झाले.

वादक कलाकारांनीही आपली प्रतिभा खुलवली. नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, शाम चंदनशिवे आणि सागर घोडके यांच्या वादनकौशल्याने कार्यक्रमाला अप्रतिम रंग चढवला.

कार्यक्रमाचे निवेदन रत्ना दहीवेलकर यांनी आपल्या ओघवत्या,कवितामय शैलीत केले.
*मंगलसुरांच्या दीपबंधाने रसिकांचे अभ्यंगस्नान*

*भावनांच्या शब्दसुरावटीने दिवाळी पहाट उजळली*

*पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात गायक-वादकांचे सूर सजले; रसिकांनी दिली भरभरून दाद*

*पिंपरी, १८ ऑक्टोबर २०२५ :* प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक झुळुकींनी सजलेली दिवाळीची पहाट… कानात झंकारणारे स्वर, भावनांच्या लहरींनी ओथंबलेले वातावरण… आणि शेकडो संगीतप्रेमींची मिळणारी दाद… अशा संगीतमय वातावरणात मंगलसुरांच्या अभ्यंगस्नानाने रसिकांची दिवाळीची पहाट अविस्मरणीय झाली. आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात सुरांच्या दीपांनी व भावनांच्या शब्दसुरावटीने आजची पहाट उजळली.

भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट २०२५ – दीपबंध सुरांचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी उमा दरवेश, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, नाट्यगृह व्यवस्थापक राकेश सौदे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक बबिता गावंडे, समन्वयक समीर सूर्यवंशी, संगीत शिक्षक नंदीन सरिन, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, संतोष साळवे, उमेश पुरोहित ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, प्रतिभा मुनावत, माजी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.सतिष गोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या सुरेल सोहळ्यात संगीताच्या रेशमी तारा, सुरांच्या लहरी आणि भावनांच्या झंकाराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

“सुर निरागस हो…” या भावगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.ज्यामध्ये गायक-वादकांनी रसिकांच्या मनांवर आपल्या शब्दसुरांनी लहर सोडली. त्यानंतर बंदिशी वादनांनी कार्यक्रमाला गोडवा आणला, तर अभंग आणि भक्तिगीतांनी उपस्थितांची मनं भक्तिरसाने ओथंबली, आणि संगीताच्या लाटांवर रसिकांची मनं तरंगू लागली. गायक कोमल कृष्णा, राजेश्वरी पवार, विनल देशमुख, गणेश मोरे यांनी ‘शोधी सी मानवा’, ‘सूर तेच छेडीता’, ‘अधीर मन झाले’, ‘बहरला हा मधुमास नवा’, ‘पिया तो से नयना लागे रे’, ‘ये हसी वादिया’, ‘मेरे ढोलना सुन’…अशी विविध मराठी आणि हिंदी गीतं सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगातून भक्तिरसाची पेरणी केली. ‘माऊली माऊली रूप तुझे’ या गाण्याच्या सुरांनी संगीतमय तोरण चढवले, आणि रसिकांचे मन मंत्रमुग्ध झाले.

वादक कलाकारांनीही आपली प्रतिभा खुलवली. नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, शाम चंदनशिवे आणि सागर घोडके यांच्या वादनकौशल्याने कार्यक्रमाला अप्रतिम रंग चढवला. कार्यक्रमाचे निवेदन रत्ना दहीवेलकर यांनी आपल्या ओघवत्या,कवितामय शैलीत केले.

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

6 days ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

6 days ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

3 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

4 weeks ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

4 weeks ago