Categories: Uncategorized

Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब चिंचवडमध्ये पारंपरिक जल्लोषात संपन्न भव्य सोहळा

Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21 ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरात पारंपरिक जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात “श्रावण सुंदरी 2025” हा भव्य सोहळा आज (17 ऑगस्ट) चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. पिंपरी चिंचवड शहरातील फॅशन इंडस्ट्रीतील मोठं नाव आयोजक सौ. सई तापकीर यांच्या उत्तम नियोजनात व फॅशन ग्रूमर योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. यात Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने  ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब पटकवला.

यावेळी झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांची यादी

Category Winner Name

Kids सानिका सावळे
Teens शर्वरी कांबळे
Miss जिया देव्हारे
Mrs सौ. सरिता बेगुडे
Mr ओम काळे

✨ या स्पर्धेचे परीक्षण Mrs. जाहिरा शेख, मंगेश सर आणि विकी शिंदे यांनी केले. कसून परीक्षणानंतर योग्य विजेते ठरवण्यात आले. फॅशन शो, मंगळागौर खेळ, मेकअप स्पर्धा यांसारख्या उपक्रमांमुळे कार्यक्रम रंगतदार झाला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. यावेळी आधार फॉउंडेशन चिफ आणि भा.ज.पा चे सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेन्ट श्री.धनराज गवळी हेही उपस्थित होते.

“हा सोहळा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच कार्यक्रम अविस्मरणीय ठरला” असे आयोजिका सौ. सई तापकीर यांनी सांगितले.

 

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

5 days ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

6 days ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

7 days ago

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

3 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

4 weeks ago