महाराष्ट्र 14 न्यूज, 2 नोव्हेंबर: भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करणार आहेत. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक उमेदवाराच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे, चिंचवडचे राहुल कलाटे, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.2) पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी तर्फे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी फराळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदानासाठी आवर्जून घराबाहेर पडा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
दिवाळी फराळ कार्यक्रमाला उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षा बिंदू तिवारी, ओबीसी विभाग अध्यक्ष किशोर कळसकर, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जॉर्ज मॅथ्यू, ऑल इंडिया सेवा दलाचे सचिव संग्राम तावडे, कामगार नेते विष्णूपंत नेवाळे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, महिला नेत्या शामला सोनवणे, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, उपाध्यक्ष मकरध्वज यादव, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ जगताप, ऍड अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष बाबा बनसोडे, युवक काँग्रेसचे गौरव चौधरी, पर्यावरण सेलचे अमर नाणेकर यासह शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक उपस्थित होते.
कैलास कदम यावेळी म्हणाले, आपल्याला महाविकास आघाडी म्हणून शहराच्या तीनही मतदारसंघांमध्ये काम करायचे आहे. एकजूट होऊन, एकदिलाने काम करून तीनही मतदार संघात आपल्या विचारांचे उमेदवार निवडून आणायचे आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काँग्रेसच्या विचारांना मानणारे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येईल असे देखील कैलास कदम म्हणाले.
काँग्रेसचा विश्वास विजयात परावर्तित होईल :-
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे म्हणाले शहरातील भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारी मिळाली असली तरी आपण महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. यंदाची लढाई भ्रष्टाचार, एकाधिकारशाही यांच्या विरोधात आहे. राज्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या विचाराचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवार जिंकून येणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने काँग्रेसकडून मिळालेला प्रतिसाद महत्त्वाचा आहे. हा प्रतिसाद विजयात परावर्तित होईल असा विश्वास अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…