महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ मे) : श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिरासाठी २,५०,०००/- रुपये प्रवचन मानधन देणगी मा. नगरसेवक आप्पा बागल यांचे सासरे रावेत नगरीचे प्रगतीशील शेतकरी व उद्योजक स्वर्गीय श्री.स्वामी काका भोंडवे यांचे स्मरणार्थ त्यांचे परिवाराकडून ह भ प पंकज महाराज गावडे यांच्या प्रवचन सेवेत देण्यात आली. ही सेवा मार्गदर्शक विजूशेठ जगताप यांच्या आग्रहा नुसार संपन्न झाली असे गावडे महाराज म्हणाले. यावेळी श्रीमती सीताबाई स्वामी भोंडवे व त्यांच्या मुलींकडून देहू संस्थान चे नितिन महाराज मोरे, विजू शेठ जगताप, विजू आण्णा जगताप, मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, बापू शेलार, रघुवीर शेलार, इंगवले, सुर्यवंशी, आढाव महाराज यांच्या हस्ते देणगी चेक देण्यात आला.
मार्गदर्शक विलास काका लांडे पाटील यांनी आदरांजली वाहिली तर बाळासाहेब काशिद पाटील यांनी प्रतिमा पूजन केले.या पुर्वी स्वामी काका भोंडवे यांनी मंदिर निर्माण कार्यास रु.२५००००.०० देणगी दिलेली आहे.आजपर्यंत या परिवाराकडून रु.५०००००.०० {पाच लाख रु.} देणगी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे प्राप्त झाली आहे.या भोंडवे परिवाराकडून अंतकरणपूर्वक दिलेल्या देणगीबद्दल श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट चे वतीने आभार मानले.
संत तुकोबारायांना जेथे अभंगवाणी स्फुरली, त्या भंडारा डोंगरावर त्यांचे भव्य मंदिर उभे राहात असून, मंदिरासाठी शंभर कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असून वारकरी संप्रदायाकडून या निधीचे संकलन सुरू आहे. यामध्ये ह भ प पंकज महाराज गावडे यांचे योगदान खूपच मोठे आहे. त्यांनी आजपर्यंत ज्याठिकाणी आपली प्रवचन सेवा केली त्याठिकाणीमिळणारी देणगी स्वरूपातील मदत त्यांनी या मंदिराच्या उभारणी करीता दिली आहे, आणि यापुढेही ते देत राहणार आहेत.
*चला बदलूया राष्ट्र घडवूया..!*
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…