Google Ad
Uncategorized

… हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार … पहा,कोण म्हणालं?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यातली मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे या अखेर महाविकास आघाडीत आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार आहेत. अगदी कालपर्यंत कळतेय, समजतेय अशा चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी स्वतःच एक सूचक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यातच त्यांना हा धक्का बसला आहे.

रूपाली पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …त्यामुळे त्यांना आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश नक्की झाला आहे, हे अखेर जाहीर केले आहे.

Google Ad

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत”, असं भावनिक पत्र रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना लिहिलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!