Categories: Editor ChoicePune

Pune : कल्याणीनगर व वडगावशेरी , पुणे परिसरात टॅम्पो चोरी करणा-यास अटक … येरवडा पोलिसांची कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : येरवडा पोलीस स्टेशन गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस नाईक नवनाथ मोहिते , पोलीस नाईक अमजद शेख , पो . कॉ . अनिल शिंदे , यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा करणारा इसम निंबळक , अहमदनगर याठिकाणी राहणारा असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहिती मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो , येरवडा पोलीस स्टेशन पुणे यांना कळविल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे अहमदनगर येथे जावुन सदरचा गुन्हा करणारे इसमाचा शोध घेवुन इसम नामे संतोष अशोक खंडागळे , वय -२४ वर्ष , धंदा – मजुरी , रा . मु . पो . निंबळक , ता . जि . अहमदनगर , यास दि .०४ / ०२ / २०२१ रोजी ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे . त्याच्याकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला ५०,००० / – रुपये किंमतीचा टेम्पो क्र . एमएच १२ , एमव्ही ३४८८ , तसेच येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .३ ९ / २०२१ भा.दं.वि.कलम ३७ ९ या गुन्हयातील कि . रु . १,२५,००० / – रुपयांचा छोटा हत्ती टेम्पो क्र . एमएच १४ , डीएम ०२८ ९ असे दोन टेम्पो हस्तगत करण्यात आले आहेत .

सदरची कामगिरी पुर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री . नामदेव चव्हाण साो , परिमंडळ ४ पुणे चे पोलीस उप – आयुक्त श्री . पंकज देशमुख सो , सहा . पोलीस आयुक्त श्री . किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . युनूस शेख , व पोलीस निरीक्षक श्री . अजय वाघमारे , तपास पथकाचे सहा . पोलीस निरिक्षक श्री . समीर करपे , पोलीस अंमलदार पोलीस हवालदार गणपत थिकोळे , पोलीस नाईक नवनाथ मोहिते , अमजद शेख , तुषार खराडे , गणेश वाघ , किरण घुटे , दत्ता शिंदे , पो.कॉ. अनिल शिंदे , सुनिल नागलोत , संजय भरगुडे , राहुल परदेशी , सुनिल सकट , अजय पडोळे यांनी केली आहे

.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

13 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago