वर्षपूर्ती … पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने गौरव सोहळा राम-लक्ष्मणाच्या विजयाचा!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय होऊन विध्यमान आमदारांना आज २४ ऑक्टोबर ला एक वर्ष पूर्ण झाले. याच वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा कौतुक सोहळा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाला शहराचे दोन्ही आमदार सपत्नीक उपस्थित होते, यावेळी चंद्रकांत पाटील यांचाही कोथरूडचे आमदार झाल्याचे एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे तसेच महापौर माई ढोरे यांच्याहस्ते पुणेरी पगडी शाल श्रीफळ व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दोन्हीही आमदारांचा सपत्नीक सत्कार केला.

 

या सत्काराला उत्तर देताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले ” माझ्या राजकारण प्रवेशाला ३५ वर्ष झाली, यात मी चार वेळा नगरसेवक व चारवेळा आमदार झालो, तसेच एकदा खासदारकीही लढवली आहे. माझ्या यशात माझ्या कार्यकर्त्यांचा वाटा मोठा आहे. कार्यकर्त्यांनीही पक्ष वाढीसाठी संघटन करणे गरजेचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले.”

आमदार महेश लांडगे म्हणाले “पराभवातूनच माझी राजकारणाची सुरुवात झाल्याने भीती वाटत नाही. कोरोनाच्या काळात माझ्या कार्यकर्त्याने केलेले काम मी कधीही विसरणार नाही. आमच्या अडचणीला उभा राहील तो माझा माणूस अशी नागरिकांचे म्हणणे आहे आणि मी त्यांची अडचण सोडवतो त्यामुळे तेही मला विसरत नाहीत हीच माझी जमेची बाजू आहे.”

या वर्षपूर्ती कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले २००७ ला मी राजकीय गोष्टीला सुरुवात केली आणि मी पदवीधरचा आमदार झालो, पक्षाचा निर्णय मी ऐकत गेलो आणि २०१९ ला मी कोथरूडची सीमा माणस माहीत नसताना ही आमदार झालो. चंद्रकांत पाटील म्हणाले नेत्याने लक्षता ठेवावं कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवल्या शिवाय यश मिळत नसते. २०२२ चे शिवधनुष्य आपल्या समोर आहे, या निवडणूकीची आपणांस तयारी करायची आहे, लक्ष्मणभाऊंची पालिका झाली . विधानसभा झाली . आता लोकसभा शिल्लक आहे . ‘ पुढल्यावेळी करुन टाकू‘ असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, अमोल थोरात, राजू दुर्गे, राजेंद्र राजापुरे, माऊली थोरात, विनोद तापकीर ,राजेश पिल्ले तसेच भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते . शत्रुघ्न काटे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago