महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मध्ये पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ४५ % काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. तर पिंपरीमधल्या संत तुकाराम नगर इथल्या स्टेशनचं ९६ टक्के काम पूर्ण झालंय. लवकरच या स्टेशनचे सेफ्टी ऑडिट होणार आहे.
संत तुकाराम नगर स्टेशनच्या सेफ्टी ऑडिटसाठी दोन महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना पिंपरी ते फुगेवाडी हा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. या मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. पुणे मेट्रोच्या वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. नववर्षात ३ जानेवारीला बरोबर एक वर्षांनी ही दुसरी चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या चाचणीसाठी पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः ६ किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…