Google Ad
Uncategorized

ट्रॅफिक जाममुळे महिलेचा मृत्यू? 17 तासांनंतर वडगाव शेरी चौकात पलटी झालेला टँकर बाजूला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ नोव्हेंबर) : नगर रोडवरील टँकरमधून झालेल्या वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशामन दल, पोलिस आणि प्रशासनाच्या कामगिरीमुळे पुण्यात मोठा धोका टळला आहे. टँकर पलटी झाल्यामुळे वडगाव शेरी चौकात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं होते. यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या एका 62 वर्षीय महिलेचं निधन झालेय.

पुणे अहमदनगर चौकात रस्त्याच्या मधोमध टँकर पलटी होऊन रस्त्यावर ज्वलनशील पदार्थ सांडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. ही वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. मात्र, सकाळी कार्यालयाची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दरम्यान, एक 62 वर्षीय आजारी महिला उपचारासाठी कुटुंबीयांसोबत कारमधून रुग्णालयात जात होती.

Google Ad

वाहतूक कोंडीमुळे त्या कारला वेळीच जागा मिळाली नाही. त्यामुळे महिलेला उपचारासाठी वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे कारमध्येच त्या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. वेळेवर महिलेला वाट मिळाली असती, वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया काही जणांच्या आल्या. ट्र्र्रॅफिक जाममध्ये उपचाराला जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!