Categories: Editor Choice

Pune : केतकी माटेगावकरच्या भावाने का केली आत्महत्या ?

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१६ जुलै) : सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाने पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नोकरी मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अक्षय असे त्याचे नाव असून, तो अवघ्या २१ वर्षांचा होता. अक्षय माटेगावकर हा केतकीचा चुलत भाऊ होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचे एक सूसाईड नोट लिहून ठेवली होती.

अक्षय हा इंजिनीअरिंग करत होता. आणि शिक्षणानंतर ‘प्लेसमेंट’ मिळणार नाही या भीतीने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना सुसगाव येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. अक्षय हा कम्प्युटर इजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. परंतु नोकरी मिळणार नाही या भीतीने घाबारून जाऊन त्याने आपल्या राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली.अक्षयने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ‘ही शेवटची गोष्ट असेल जी मी लिहीत आहे. आई, बाबा, आकांक्षा मला माफ करा. तुमच्या अपेक्षा पूर्ण न करण्यासाठी मी माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले पण मला जमलं नाही. माझ्या इन्टर्नशिपमध्ये मी चांगले काम केले नाही आणि त्यामुळे मला माहित आहे की मला चांगली नोकरी मिळणार नाही. हे सगळं तुम्हाला सांगायची माझ्यात हिंमत नाही. आणि याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय नाही. आई बाबा आकांक्षा मला माफ करा. तुमचा अक्षय माटेगावकर.’असे म्हणत अक्षयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या धक्कादायक कृतीने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. अक्षयच्या घरची परिस्थिती उत्तम होती तसेच त्याचे पालक नोकरी करतात अशी माहिती समोर येत आहे. अक्षय मित्रांसोबत माउंट युनियन सोसायटीच्या आठव्या मजल्यावर राहायचा. तिथूनच उडी मारून त्याने प्राण दिल्याचं समोर येत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

13 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago