Categories: Editor Choice

कासारवाडीतील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रमात … गुरुपौर्णिमे निमित्ताने समाजात योगदान देणाऱ्यांचा ‘गुरुगौरव पुरस्काराने’ सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १३ जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील दत्त मंदिर हे साई सेवा कुंज आश्रम या नावाने ओळखले जाते. बुधवारी येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी शहरातील विविध ठिकाणाहून भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी सकाळी होमहवणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला, गाभाऱ्यात मूर्तीस सजवण्यात आले होते, दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे गर्दी करताना दिसत होते.

श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात गुरुपौर्णिमा निमित्त विविध सामाजिक , अध्यात्म, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘गुरुगौरव सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले. बुधवार दि १३/०७/२०२२ रोजी सकाळी होमहवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तसेच सायं ६ ते ८ भजन व ह भ प बाबा महाराज काडगावकर कीर्तनरुपी सेवा झाली यावेळी मोठया प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आज झालेल्या कार्यक्रमात ‘गुरुगौरव सन्मान’ श्री . गुलाबराव भिलारे ( स्ट्रक्चरल इंजिनियर ), श्री . बबनराव बाबुराव येडे ( उद्योजक ), श्री . राधाकिशन जगन्नाथ लाहोटी ( सीए ), अॅड . श्री . सखाराम कोळसे पाटील, श्री . प्रकाश नामदेव काटे ( उद्योजक ), श्री . विजय विष्णुपंत सातपुते ( वृक्षसंवर्धन , घोराडेश्वर डोंगर ), श्री . प्रकाश मिटभाकरे , श्री . विजय उर्फ आप्पा रेणुसे ( शैक्षणिक व क्रीडा ), डॉ . किरण प्रदीप माकन ( वैद्यकीय क्षेत्र )

तसेच पंढरीच्या वारीमध्ये १५ दिवस वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणाऱ्यांना ‘पंढरीची वारी आरोग्य सेवा सन्मान’ डॉ . देविदास हरिश्चंद्र शेलार, डॉ . मनीषा ज्ञानोबा साबणे ( वैद्यकीय अधिकारी आदित्य बिर्ला हॉस्पिटल ), श्री . भाऊसाहेब जगन्नाथ जाधव, हरीचंद्र गायके तसेच पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले.यावेळी कीर्तनकार ह भ प बाबामहाराज काडगावकर, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे , ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे, ह.भ.प. सुप्रियाताई साठे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज काशीद ( अध्यक्ष , भंडारा डोंगर ट्रस्ट ), ह.भ.प. जयंत उर्फ आप्पा बागल ( सचिव , महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड शहर ) , ह.भ.प. राजाराम महाराज देवडकर ( मृदंगमणी ) यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच लोकमत चे पत्रकार संतोष महामुनी यांचा सत्कार करण्यात आला.

आणि ‘आदर्श माता सन्मान’ श्रीमती सीताबाई रामदास गायकवाड, श्रीमती अनुसया माता, सौ . यमुनाबाई भटू करंजुले, श्रीमती आशाताई रवींद्र कामथे, सौ . उषा वसंत कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी शिवनांद स्वामी महाराज, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, सुभाषदादा काटे, नाना करंजुले, सुनिलशेठ येडे,  गणेश सोनवणे, डुंबरे,  माऊली जगताप, महेशशेठ कामथे, सागर अंगोळकार, सौ.जयश्रीताई जगताप, सौ. उज्वलाताई गावडे, उद्धव कवडे, संदिप दरेकर, मिलिंद कंक, राजू नागणे, अमोल तावरे, प्रवीण पाटील, सुनील कोकाटे, अशोक कवडे, सखाराम रेडेकर, प्रवीण जगताप, राजेंद्र येडे, सचिन कवडे, सोनू कवडे, ललित म्हसेकर, आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गर्जे गुरुजी यांनी केले.

पंढरीची वारी आरोग्य सेवा सन्मान

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

3 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

10 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

23 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago