Google Ad
Uncategorized

वेळ आल्यावर ज्याचा त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार … आमदार महेश लांडगे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ नोव्हेंबर) : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर तीन अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या फेकण्याची घटना घडली, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पिंपळेगुरव येथे ही घटना घडली . यात कोणतीही वित्त किंवा मनुष्य हानी झालेली नाही . याप्रकरणी पोलीस तपासात चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे .

काल दुपारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधु व उद्योजक शंकरशेठ जगताप यांच्या कार्यालयावर काही अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बाँब टाकला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी व हल्लेखोरांना शोधले आहे, त्या पोलिस प्रशासनाचे कौतुक करण्यासाठी आज सकाळी ११.०० वाजता सृष्टि चौक पिंपळे गुरव येथे भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, महापौर माई ढोरे, सदाशिव खाडे, शिक्षण समितीच्या सभापती माधवी राजापुरे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, महिला बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, शशिकांत कदम, उषा मुंढे, महेश जगताप, सागर अंगोळकर, हर्षल ढोरे,  बाबासाहेब त्रिभुवन,महेश जगताप, चंद्रकांत नखाते, शारदा सोनवणे, गजानन चिंचवडे, भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Google Ad

यावेळी बोलताना नामदेव ढाके म्हणाले …

यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले …

यावेळी या भ्याड हल्ल्याच्या विरोधात निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या, आणि सांगवी पोलिस स्टेशन यथे निवेदन देण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!