शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र 14 न्यूज : शिवसेना दसरा मेळावा २०२०, काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे –

बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला, वाघ पाहून तो लपला, मुख्यमंत्र्यांची राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तेज जन्माला आलं, ते तेज कायम आहे.: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देव, मंदिर, पूजा, अर्चा हे आमचं हिंदुत्व नाही, बाळासाहेबांनी सांगितलेलं आमचं हिंदुत्व – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना आहे, संकट आहे, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून, जीएसटीची प्रणाली फसली असेल तर पंतप्रधानांनी आपली चूक मान्य करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देश संकटात आहे आणि भाजप राजकारण करतंय, हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संघमुक्त भारत हवे म्हणणारे नितीश कुमार भाजपला कसे चालतात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे?? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, आमचे जीएसटीचे पैसे मिळायलाच हवेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय, मुंबईत यायचं आणि इथल्या मातेशी नमकहरामी करायची, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर मुख्यमंत्र्यांचा प्रहार

इथं काम करणारी पोरं महाराष्ट्राच्या मातीतली हवी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत- मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे

तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही 808 एकर जंगल वाचवलं, एक नवा पैसाही खर्च न करता कारशेड उभारतोय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात आता कळसूत्र्या बाहुल्यांचा खेळ होणार नाही, पाडापाडी करण्यात भाजपला रस आहे, ही अराजकता आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बिहारच्या जनतेने प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावं, कोणाला करावं हे मी सांगणार नाही, फक्त डोळे उघडे ठेवून मतदान करा-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा, धनगर, आदिवासी, सगळ्या समाजाला न्याय देणार, कुणाचंही आरक्षण काढून न घेता सगळ्यांना मी न्याय देईन….

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago