‘महाराष्ट्र प्रेस क्लब’ मध्ये पिंपरी चिंचवड मधील तरुण पत्रकारांना संधी … दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्यकारणीची घोषणा!

महाराष्ट्र 14 न्यूज : दसरा व विजयादशमीच्या मुहूर्तावर ताथवडेमधील हॉटेल ब्लू वॉटर येथे आज, रविवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रेस क्लब, पिंपरी चिंचवडची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तरुण पत्रकारांना संधी देण्यात आली आहे.

या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अमोल शित्रे, उपाध्यक्षपदी मनिषा थोरात- पिसाळ, कार्याध्यक्षपदी गणेश हुंबे, सरचिटणीसपदी अमोल काकडे, कोषाध्यक्ष विकास शिंदे, कार्यकारिणी अमृता ओंबाळे, आणि प्रदीप लोखंडे यांची निवड करण्यात आली. तर, कायदेशीर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ पत्रकार तथा विधिज्ञ संजय माने यांच्याकडे कामकाज सोपविण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील पत्रकारांसाठी, तसेच शहराच्या जडणघडणीत सामाजिक दृष्टीने युवा पत्रकारांनी योगदान देणे आवश्यक आहे. हा हेतू समोर ठेवून संस्थात्मक पध्दतीने एकत्र येण्यासाठी महाराष्ट्र प्रेस क्लब, पिंपरी-चिंचवडची स्थापना करण्याबाबत चर्चा सुरू होती.

मागील वर्षभरापासून या संदर्भात शहरातील विविध माध्यमात काम करत असलेल्या ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या संकटामुळे संस्थेची स्थापना व कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब लागला. अखेर आज दस-याच्या शुभमुहूर्तावर कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago